Harmanpreet Kaur Fined: भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिला गैरवर्तन केल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात आला आहे. स्टंपवर बॅट फेकून मारणे कर्णधार हरमनप्रीत कौरला चांगलेच महागात पडले आहे. अंपायरशी हुज्जत घातल्याप्रकरणी तिला आयसीसीने सक्त ताकीदही दिली आहे. आयसीसीचा नियम काय सांगतो ते, जाणून घ्या.

हरमनप्रीत कौरच्या बाबतीत दिलेला पायचीतचा निर्णय हा वादाचा विषय ठरला आहे. भारताच्या बांगलादेश दौऱ्यातील शेवटचा एकदिवसीय सामना खूप वादग्रस्त ठरला. फलंदाजीदरम्यान बाद झाल्यावर हरमनप्रीत कौर भडकली. अंपायरच्या चुकीच्या निर्णयावर संताप व्यक्त केला. त्यानंतर तिने सामन्याच्या शेवटी प्रेझेंटेशन दरम्यान वादग्रस्त विधानही केले. त्यानंतर आयसीसीने तिला दंड ठोठावला आहे. हरमनप्रीत कौरला तिच्या मॅच फीच्या ७५ टक्के दंड भरावा लागेल. यासोबतच दोन गुणही कापले जातील.

Vande Bharat passenger finds insects in food, Railways slaps Rs 50000 fine on caterer
वंदे भारत प्रवाशाला अन्नात सापडले किडे, रेल्वेने केटररला ठोठावला ५० हजार रुपयांचा दंड
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Worli hit and run case, High Court, Mihir Shah claim,
वरळी हिट अ‍ॅण्ड रन प्रकरण : गुन्हा करताना सापडल्यानंतरही अटकेचे कारण सांगणे अपरिहार्य ? मिहिर शहाच्या दाव्यावर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला
Dhankawadi gambling den, Raid on gambling den,
पुणे : धनकवडीत जुगार अड्ड्यावर छापा; दहाजणांविरुद्ध गुन्हा
sexual harassment crime victim, compensation,
लैंगिक छळाच्या गुन्ह्यात पीडितेला नुकसान भरपाईचा आदेश देणे अपेक्षित…
Mumbai High Court Verdict On Marriage Cruelty.
सुनेला टीव्ही पाहू न देणे ही क्रूरता? मुंबई उच्च न्यायालयातील खटला २० वर्षांनी निकाली
Ranji Trophy Mumbai Crush Odisha By An Innings & 103 Runs
Ranji Trophy : शम्स मुलानीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने ओडिशाचा उडवला धुव्वा! एक डाव आणि १०३ धावांनी चारली धूळ

भारतीय महिला क्रिकेट संघ बांगलादेश दरम्यानच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात विजयी होऊ शकला नाही, दोन्ही संघात सामना टाय झाला. भारतीय महिला संघाला एकदिवसीय मालिका जिंकण्यात अपयश आले. शेवटच्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार हमरनप्रीत कौर नाराज झाली होती. अंपायरने आऊट दिल्यानंतर हरमनप्रीतने बॅट स्टंपला आदळली. त्याचवेळी, सामना संपल्यानंतर तिने प्रेझेंटेशन दरम्यान एक विधानही केले की, “पुढच्या वेळी बांगलादेशला येण्यापूर्वी संघालाही अशा अंपायरिंगला सामोरे जावे लागेल हे आम्ही लक्षात ठेवू आणि त्याची मानसिक तयारी करू.”

हरमनच्या या प्रतिक्रियेनंतर आयसीसीने तिला दंड ठोठावला आहे. तिला मॅच फीच्या ७५ टक्के दंड भरावा लागेल. यासोबतच तिचे दोन गुणही वजा केले जातील. याशिवाय आयसीसी हरमनप्रीतवर एक कसोटी किंवा दोन मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी बंदी घालू शकते. हरमनप्रीत कौरला तिच्या या कृत्याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे. जर कोणत्याही खेळाडूने कोणत्याही सामन्याच्या अधिकाऱ्याविषयी सार्वजनिकपणे टीका केली किंवा त्याची बदनामी केली तर तो २.१.७.च्या आयसीसीच्या नियमानुसार आचारसंहितेचा भंग मानला जातो.

हेही वाचा: Harmanpreet Kaur: हरमनप्रीतने केलेल्या कृतीवर बांगलादेशच्या कर्णधाराची खोचक टीका; म्हणाली, “वागण्या-बोलण्याचे भान…”

हरमनप्रीत कौरवर बांगलादेशच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार निगार सुलतानाने टीका केली आहे. त्याचवेळी भारतीय महिला फलंदाज स्मृती मंधाना आपल्या कर्णधाराच्या बचावात मैदानात उतरली आहे. बांगलादेश दौऱ्यातील शेवटच्या सामन्याबद्दल जर बोलायचे झाले तर या सामन्यात भारतीय महिला खेळाडूंची चांगली कामगिरी करूनही त्यांना मालिका जिंकता आली नाही. परिणामी सामना बरोबरीत सुटला. या सामन्यात स्मृती मंधानाने ५९, हरलीन देओलने ७७ धावा केल्या. तर हरमनप्रीत कौर १४ धावा काढून बाद झाली.