घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध मालिकेआधी भारतीय महिला क्रिकेट संघाला धक्का बसला आहे. उप-कर्णधार हरमनप्रीत कौर पायाला झालेल्या दुखापतीमुळे संघाबाहेर गेली आहे. 22 फेब्रुवारीपासून भारतीय महिला मुंबईत इंग्लंडविरुद्ध 3 वन-डे तर 4 मार्चपासून गुवाहटीत 3 टी-20 सामने खेळणार आहे. हरमनप्रीतच्या अनुपस्थितीत सराव सामन्यात आश्वासक खेळी करणाऱ्या हरलिन देओलला संघात स्थान देण्यात आलेलं आहे.

पटीयाला येथे सरावादरम्यान हरमनप्रीतच्या पायाला दुखापत झालेली आहे. त्यामुळे ती आता बंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आपल्या फिटनेसवर भर देणार आहे. टी-20 मालिकेपर्यंत हरमनप्रीतच्या दुखापतीत सुधारणा न झाल्यास स्मृती मंधानाकडे भारतीय संघाचं नेतृत्व देण्यात येईल.

Story img Loader