ICC T20 Women’s Rankings: सध्या श्रीलंकेत महिला टी-२० आशिया कप खेळला जात आहे. भारतीय संघाने आपले सलग दोन सामने जिंकून उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल कायम ठेवली आहे, आज हा संघ आपला तिसरा सामना नेपाळसोबत खेळताना दिसणार आहे. भारतीय संघ उत्कृष्ट कामगिरी करत असून यंदाचा आशिया कप जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. दरम्यान नवीन ICC T20 Rankings जाहीर झाली आहे. याचा फायदा भारतीय खेळाडूंना होताना दिसत आहे. विशेषत: भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि शेफाली वर्मा यांनी मोठी झेप घेतली आहे.
हेही वाचा – Olympics 2024: ऑलिम्पिकच्या लोगोमध्ये पाच वर्तुळ का असतात? काय आहे याचा अर्थ; जाणून घ्या
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, शेफाली वर्मा आणि ऋचा घोष यांनी ICC T20 क्रमवारीत झेप घेतली आहे. श्रीलंकेत सुरू असलेल्या आशिया कप २०२४ मुळे टी-२० क्रमवारीत मोठे बदल दिसून आले आहेत. भारताने आतापर्यंत पाकिस्तान आणि यूएईवर मोठे विजय नोंदवले आहेत. कर्णधार हरमनप्रीत आणि सलामीवीर शेफाली टी-२० फलंदाजी क्रमवारीत अव्वल १० मध्ये स्थान मिळवण्याच्या जवळ पोहोचले आहेत. दोघीही आता संयुक्तपणे ११व्या क्रमांकावर आहेत.
शेफाली वर्माने पाकिस्तानविरुद्धच्या ४० धावांच्या खेळीनंतर चार स्थानांनी झेप घेतली आहे. यूएईविरुद्धच्या ६६ धावांच्या खेळीचा फायदा हरमनप्रीत कौरला झाला आहे. रिचा घोषने UAE विरुद्ध २९ चेंडूत ६४ धावांची नाबाद खेळी खेळली. यानंतर ती २८व्या स्थानावरून २४व्या स्थानावर पोहोचली आहे.
गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर भारतीय वेगवान गोलंदाज रेणुका सिंगने पाकिस्तानविरुद्ध १४ धावांत दोन विकेट घेतल्या. यानंतर ती १०व्या स्थानावरून नवव्या स्थानावर आली आहे, म्हणजेच तिने एका स्थानाची झेप घेतली आहे. दीप्ती शर्माने टी-२० मधील अष्टपैलू आणि गोलंदाजी क्रमवारीत तिसरे स्थान कायम राखले आहे, तर स्मृती मानधनाही पाकिस्तानविरुद्ध शानदार ४५ धावा करून पाचव्या स्थानावर कायम आहे.
स्मृती चौथ्या स्थानावर असलेल्या लॉरा वोल्वार्डपेक्षा अवघ्या पाच गुणांनी मागे आहे आणि आशिया चषक स्पर्धेतील उर्वरित सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करून तिला क्रमवारीत झेप घेण्याची संधी आहे. टी-२० फलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाची बेथ मुनी अव्वल स्थानावर आहे. गोलंदाजांमध्ये इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन अव्वल स्थानावर आहे.