महिला प्रीमियम लीग २०२३ च्या लिलावात मुंबई इंडियन्सने इंग्लंडची स्टार खेळाडू नताली सिव्हर हिच्यासाठी तब्बल ३.२० कोटी रुपये मोजले. नताली ही मुंबईच्या संघातली आतापर्यंतची सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे. मुंबईने आतापर्यंत अनेक स्टार क्रिकेटपटूंना आपल्या संघात सहभागी करून घेतलं आहे. यस्तिका भाटिया हिच्यासाठी मुबंईने तब्बल १.५० कोटी रुपये मोजले. यस्तिका यष्टीरक्षक आणि मधल्या फळीतली भरवशाची फलंदाज आहे. ती सध्या भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व करत आहे.
दरम्यान, मुंबईने भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरवर १.८० कोटी रुपयांची बोली लावत तिला आपल्या संघात सहभागी करून घेतलं आहे. हरमनकडेच मुंबईच्या संघाचं नेतृत्व देखील दिलं जाऊ शकतं अशी चर्चा सुरू झाली होती. या चर्चांवर मुंबई इंडियन्सने शिक्कामोर्तब केलं आहे. मुबई इंडियन्सने सोशल मीडियावर मुंबई इंडियन्सच्या पुरष संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि हरमनप्रीतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये ‘लीडर्स’ असं लिहिलं आहे. तसेच फोटोवर ‘कॅप्टन्स’ असं देखील लिहिलं आहे. हा फोटो शेअर करून मुंबईने कर्णधार म्हणून हरमनच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.
हे ही वाचा >> मुंबईच्या जेमिमासाठी यूपी-दिल्लीचा सामना, ‘इतक्या’ कोटींच्या बोलीवर दिल्लीने मारली बाजी
पूजा वस्त्राकर मुंबईच्या संघात
एमेली कर या न्यूझीलंडच्या लेग स्पीन ऑलराऊंडर खेळाडूवर मुंबईने १ कोटी रुपयांची बोली लावत तिल्या आपल्या संघात सहभागी करून घेतलं. यासह भारताची अष्टपैलू खेळाडू पूजा वस्त्राकर देखील एमआय पलटनचा भाग असणार आहे. १,९० कोटींच्या बोलीवर मुंबईने पूजाला आपल्या संघात सहभागी करून घेतलं आहे.