Harmanpreet Kaur, IND W vs BAN W: भारतीय महिला क्रिकेट संघ आणि बांगलादेश यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना बरोबरीत सुटला. ढाका येथे शनिवारी (२२ जुलै) झालेल्या या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशच्या महिला संघाने ५० षटकांत ४ विकेट्स गमावून २२५ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाहुण्या संघाचा डाव ४९.३ षटकांत २२५ धावांत आटोपला. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली आणि ट्रॉफी शेअर करावी लागली.

दोन्ही संघांमधील सामन्यादरम्यान एक विचित्र घटना समोर आली. या सामन्यादरम्यान भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर खूप भडकली होती. चुकीच्या पद्धतीने पायचीत बाद दिल्याने तिचा राग इतका वाढला की तिने बॅट स्टंपच्या दिशेने भिरकावली. एवढेच नाही तर तिने बराच वेळ अंपायरशी हुज्जत घातली. सामना संपल्यानंतर प्रेझेंटेशन कार्यक्रमात या सर्व प्रकरणावर तिखट प्रतिक्रिया दिली. ती, म्हणाली की, “पुढच्या वेळी बांगलादेश दौऱ्यावर जेव्हा येईन तेव्हा या खराब अंपायरिंगसाठी तयार राहीन.”

Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Alzarri Joseph fined by ICC for abusing fourth umpire in WI-BAN ODI Month after two-match ban for on-field tiff
Alzarri Joseph: अल्झारी जोसेफला दोन सामन्यांच्या बंदीनंतर ICC ने ठोठावला दंड, पंचांना केली होती शिवीगाळ
IND vs AUS Srikkanth Blasts at Mohammed Siraj for Travis Head Send off Said Don't You Have brains
IND vs AUS: “सिराज वेडा आहेस का तू?…”, भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद सिराजवर संतापले, हेडच्या वादावर केलं मोठं वक्तव्य
abhishek bachchan aishwarya rai
ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन दुसऱ्यांदा आई-बाबा होणार? रितेश देशमुखच्या ‘त्या’ प्रश्नावर अभिनेता म्हणाला…
Captain Rohit Sharma reacts after disappointing Adelaide Test performance by batsmen sports news
फलंदाजांची कामगिरी निराशाजनक, गोलंदाजीत बुमराला साथ आवश्यक! अॅडलेड कसोटीनंतर कर्णधार रोहितची प्रतिक्रिया
IND vs AUS Travis Head Reveals Discussion with Mohammed Siraj About Their Fight in 2nd test Watch Video
VIDEO: सिराज आणि हेडमध्ये नेमकं काय बोलणं झालं? सिराजने भांडण मिटवलं का? त्यावर हेड काय म्हणाला?
Rohit Sharma Statement on Mohammed Siraj and Travis Head Fight in IND vs AUS 2nd Test
IND vs AUS: “मर्यादा ओलांडायला नको…”, रोहित शर्माने सिराज-हेडच्या वादात भारतीय गोलंदाजाची घेतली बाजू, सामन्यानंतर केलं मोठं वक्तव्य

सामन्यानंतर हरमनने अंपायरिंगवर खरमरीत टीका केली

सामना संपल्यानंतर हरमनप्रीत कौर म्हणाली, “मला वाटते की आम्हाला या सामन्यातून खूप काही शिकायला मिळाले. क्रिकेटशिवाय अंपायरिंगचे जे प्रकार घडत होते, त्याचे आम्हाला खूप आश्चर्य वाटले. पुढच्या वेळी अशा हीन दर्जाच्या अंपायरिंगचा सामना करण्यासाठी जेव्हा आम्ही बांगलादेशात येऊ तेव्हा आमच्या मनाची करून घेऊ की, आम्हाला अशा प्रकारच्या अंपायरिंगला सामोरे जावे लागेल. त्यानुसार आम्ही स्वतःची मानसिक तयारी करू.”

भारतीय कर्णधार हरमन पुढे म्हणाली की, “ बांगलादेशने खरोखरच चांगली फलंदाजी केली, परिस्थितीनुसार त्यांनी खेळी केली. त्यांनी एकेरी-दुहेरी धावांवर भर दिला जो खूप महत्त्वाचा होता. मधल्या षटकात आम्ही काही धावा दिल्या पण आमच्या फलंदाजीवेळी सामन्यावर चांगले नियंत्रण ठेवले होते. मी आधी सांगितल्याप्रमाणे सामन्यात अतिशय खराब दर्जाची अंपायरिंग झाली, अंपायरने दिलेल्या काही निर्णयांमुळे आम्ही खूप निराश झालो आहोत.” असे म्हणत तिने नाराजी व्यक्त केली.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने १३९ धावांत तीन विकेट्स गमावल्या होत्या. यास्तिका भाटिया पाच आणि शफाली वर्माने चार धावा करून बाद झाल्या. स्मृती मंधानाने ५९ धावा केल्या. मंधाना बाद झाल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर हरलीन देओलला साथ देण्यासाठी क्रीझवर आली, पण तिला जास्त वेळ फलंदाजी करता आली नाही. हरमनप्रीत १४ धावा करून नाहिदा अख्तरच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू आऊट झाली.

हेही वाचा: BAN-W vs IND-W: आउट देताच कर्णधार हरमनप्रीत कौर भडकली, त्यानंतर असे काही केले की…; पाहा Video

हरमनप्रीतने ३४व्या षटकात नाहिदाचा चौथा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न केला. ती शॉट हुकली गोलंदाज आणि सहकारी खेळाडूंनी पायचीत आऊटसाठी अपील केल्यावर अंपायरने हरमनप्रीतविरुद्ध निर्णय दिला. आऊट दिल्यानंतर तिला राग आला. तिने रागाने स्टंपवर बॅट फेकली आणि पॅव्हेलियनकडे जाताना तिने अंपायरला सांगितले की, “चेंडू बॅटला आधी लागला होता. याशिवाय हरमनप्रीतने प्रेक्षकांना अंगठाही दाखवला.”

Story img Loader