Harry Brook Triple Century at Multan in PAK vs ENG Test: हॅरी ब्रुकने पाकिस्तानमधील प्रसिद्ध मुलतानच्या क्रिकेट मैदानावर तिहेरी शतक झळकावत इतिहास घडवला आहे. याच मैदानात वीरेंद्र सेहवागने २००४ मध्ये पाकिस्तानात तिहेरी शतक झळकावत मुलतान का सुलतान हे नाव मिळवलं होतं. हॅरी ब्रुकने आता हे नाव आपल्या नावापुढे जोडलं आहे. हॅरी ब्रुकने १४३ व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर चौकार लगावत आपले त्रिशतक पूर्ण केले. कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा तो इंग्लंडचा सहावा फलंदाज ठरला आहे. तत्पूर्वी, जो रूट ३७५ चेंडूंत १७ चौकारांच्या मदतीने २६२ धावा करून बाद झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाकिस्तानातील मुलतान येथे इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात कसोटी सामना खेळवला जात आहे. या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या दोन फलंदाजांनी अक्षरश: कहर केला आहे. इंग्लंडचा युवा फलंदाज हॅरी ब्रुकने तिहेरी शतक झळकावले आहे. हॅरी ब्रुकने जो रूटला साथ देत मैदानात कायम होता. त्याने सुरूवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करत पाकिस्तानच्या गोलंदाजांना दिवसा तारे दाखवले. २८० अधिक धावांवर असतानाही हॅरी ब्रुकने नसीम शाहच्या चेंडूवर षटकार लगावत २९० धावांचा टप्पा गाठला.

हेही वाचा – Ratan Tata Death: टाटा समूहाने ‘या’ क्रिकेटपटूंच्या कारकीर्दीला दिला आकार, सुनील गावसकर, रवी शास्त्री ते युवराज सिंग आणि शार्दुल ठाकूर

३१७ धावा करत हॅरी ब्रुक सईम अयुबच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. बाद होण्यापूर्वी ब्रुकने ३२२ चेंडूत ३ षटकार आणि २९ चौकारांसह ३१७ धावा केल्या. पाकिस्तानविरुद्ध त्रिशतक झळकावणारा तो जगातील ५वा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी वेस्ट इंडिजच्या गॅरी सोबर्सने १९५८ मध्ये ३६५ धावांची नाबाद खेळी केली होती, तर २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने ३३५ धावांची नाबाद खेळी केली होती. ऑस्ट्रेलियाच्या मार्क टेलरने १९९८ मध्ये पेशावर कसोटीत नाबाद ३२४ धावा केल्या होत्या, तर भारताच्या वीरेंद्र सेहवागने ३०९ धावा केल्या होत्या. वीरूने २००४ मध्ये मुलतानमध्येच ही कामगिरी केली होती.

हेही वाचा – IND W vs SL W: भारताने वर्ल्डकपमध्ये घेतला आशिया कपचा बदला, गुणतालिकेत न्यूझीलंडला मागे टाकत उपांत्य फेरीच्या दिशेने मोठे पाऊल

वीरेंद्र सेहवागचा मुलतानमधील रेकॉर्ड हॅरी ब्रुकने मोडला

२००४ मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियासाठी मुलतानमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटीत वीरेंद्र सेहवागने ताबडतोड फलंदाजी केली. या कसोटी सामन्यात सेहवागने टीम इंडियासाठी ३०९ धावांची दमदार खेळी केली. यादरम्यान त्याने अवघ्या ३६४ चेंडूत आपले त्रिशतक पूर्ण केले. आपल्या तिहेरी शतकी खेळीत त्याने ३ चौकार आणि ६ षटकार मारून पाकिस्तानी गोलंदाजांची चांगलीच शाळा घेतली. दुसरीकडे, हॅरी ब्रुकने ३१० चेंडूत मुलतानमध्ये सर्वात वेगवान त्रिशतक झळकावले.

हेही वाचा – Ratan Tata Death: “भारताने खरं रत्न गमावलं…”, सेहवागने रतन टाटा यांना आदरांजली वाहत शेअर केली भावुक पोस्ट

हॅरी ब्रुकचे हे कसोटी क्रिकेटमधील दुसरे सर्वात वेगवान त्रिशतक आहे. सर्वात वेगवान त्रिशतक झळकावण्याचा विश्वविक्रम आजही वीरेंद्र सेहवागच्या नावावर आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २७८ चेंडूत ३०० धावा पूर्ण केल्या होत्या. हा सामना २००८-०९ मध्ये चेन्नईत खेळला गेला होता.

मुलतान कसोटी सामन्यात हॅरी ब्रुकने पाकिस्तानविरूद्ध त्रिशतक झळकावले, तर चौथ्या दिवशी जो रूटही २६२ धावांची उत्कृष्ट खेळी खेळून पॅव्हेलियनमध्ये परतला. या खेळीच्या जोरावर रूटने अनेक नवे विक्रमही रचले होते. जो रूट आणि हॅरी ब्रूक यांच्यातील ४५४ धावांची भागीदारी ही इंग्लंडसाठी आतापर्यंतची कोणत्याही विकेटसाठीची सर्वात मोठी भागीदारी आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harry brook scored 2nd fastest triple century in history of test cricket in multan and broke virendra sehwag record pak vs eng bdg