Vidarbha vs Kerala, Ranji Trophy Final Updates in Marathi: रणजी ट्रॉफी २०२४-२५ चा अंतिम सामना केरळ आणि विदर्भ यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात युवा गोलंदाज हर्ष दुबेने विदर्भासाठी चमकदार कामगिरी करत आपल्या संघाला पहिल्या डावात ३७ धावांची आघाडी मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. यंदाच्या मोसमात हर्षच्या गोलंदाजीने सर्वांच लक्ष वेधून घेतलं. यादरम्यान हर्षने रणजी ट्रॉफीत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केरळविरुद्धच्या पहिल्या डावात हर्षने ८८ धावांत तीन महत्त्वाचे विकेट घेतले. यासह तो रणजी ट्रॉफीच्या इतिहासात एका मोसमात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. या मोसमात त्याने आतापर्यंत एकूण ६९ विकेट घेतल्या आहेत. अजून एक डाव बाकी असून या डावातही तो भेदक गोलंदाजी करत तो विकेट घेईल, अशी सर्वांना आशा आहे.

हर्ष दुबेने एका मोसमात ६९ विकेट्स घेत विक्रम मोडित काढला आहे. आशुतोषने २०१८-१९ च्या मोसमात एकूण ६८ विकेट घेतल्या होत्या. आदित्य सरवटेला पहिल्या स्लिपमध्ये झेलबाद करून हर्ष दुबेने रणजी ट्रॉफीच्या चालू मोसमातील ६७वी विकेट मिळवली. यानंतर त्याने लंचपूर्वी निझारला पायचीत करत करून एका मोसमात सर्वाधिक ६८वी विकेट घेत बिहारच्या आशुतोष अमनच्या विक्रमाशी बरोबरी केली. मात्र, तिसऱ्या विकेटसाठी त्याला बरेच कष्ट घ्यावे लागतील. एमडी निधिशला पायचीत करून त्याने रणजी मोसमात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम केला.

प्रथम फलंदाजी करताना विदर्भ संघाने ३७९ धावा केल्या होत्या. दरम्यान दानिश मलेवारने संघाकडून सर्वाधिक १५३ धावांची खेळी केली होती. त्याच्याशिवाय करुण नायरने ८६ धावांचे योगदान दिले होते. यानंतर केरळचा संपूर्ण संघ केवळ ३४२ धावांवर ऑलआऊट झाला. अशाप्रकारे विदर्भाला पहिल्या डावात ३७ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली.

केरळचा कर्णधार सचिन बेबी (९८) याचे शतक अवघ्या दोन धावांनी हुकले तर अनुभवी आदित्य सरवटेने १८५ चेंडूत ७९ धावांची शानदार खेळी केली. तर सलमान निझार (२१ धावा) आणि मोहम्मद अझरुद्दीन (३४ धावा) यांना त्यांच्या चांगल्या सुरुवातीचे मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतर करता आले नाही. पण मधल्या फळीतील खेळाडूंनी संघाचा डाव सावरला.