पाकिस्तानी क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज उमर अकमल मॅच फिक्सिंगमध्ये दोषी आढळल्या प्रकरणी त्याच्यावर सोमवारी बंदीची कारवाई करण्यात आली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या शिस्तपालन समितीचे प्रमुख फैजल इ मिरान चौहान यांनी त्याला तीन वर्षांच्या बंदीची शिक्षा ठोठवली. या काळात त्याला क्रिकेटशी संबंधित कोणत्याही गोष्टीत सहभागी होता येणार नाही. अकमलच्या विरोधात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची शिस्तपालन समिती तपास करत होती. या तपासाअंती त्याला मॅच फिक्सिंग प्रकरणी दोषी ठरवण्यात आले.
“आता ‘टीकटॉक’लाच सांगतो तुला ब्लॉक करायला…”
उमर अकमलवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यात प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनीही आपले मत व्यक्त केले. “मी पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत मी दोन अतिशय प्रतिभावान खेळाडू पाहिले. एक बांगलादेशचा मोहम्मद अशरफुल आणि दुसरा उमर अकमल. पण तुम्ही कोण आहात आणि तुम्ही तुमच्या प्रतिभेचा कशाप्रकारे वापर करता यावर तुमची कारकीर्द ठरते” असे स्पष्ट मत त्यांनी मांडले.
“अखेर ‘तो’ अधिकृतरित्या मूर्खांच्या यादीत सामील झाला”
याशिवाय पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक याने अकमलवर बोचरी टीका केली. “आता उमर अकमल अखेर अधिकृतरित्या मुर्खांच्या यादीत सामील झाला. ३ वर्षांच्या बंदीची कारवाई. टॅलेंट पूर्णपणे वाया जात आहे. आता पाणी डोक्यावरून चाललं आहे. आता पाकिस्तानने संसदेत मॅच फिक्सिंग विरोधात कायदा करून दोषींना कारावासात पाठवायला हवे. अन्यथा असे लोक अजून वाढतील”, असे ट्विट करत त्याने मॅच फिक्सिंग करणाऱ्यांवर खरमरीत टीका केली.
दुर्दैवी! करोनामुळे मूळ भारतीय असलेल्या ज्येष्ठ क्रीडापटूचे निधन
दरम्यान, अकमलने एका मुलाखतीत असे सांगितले होते की त्याला सामना सुरू असताना दोन वेळा चेंडू जाणूनबुजून सोडण्यासाठी २ लाख अमेरिकन डॉलर्स देण्याचे लालूच दाखवले होते. भारताविरूद्धच्या सामन्यातच त्याला चेंडू सोडण्यास सांगितल्याचेही त्याने मुलाखतीत स्पष्ट केले. २०१५ ला ऑस्ट्रेलियात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान त्याच्याशी फिक्सिंगसाठी संपर्क साधण्यात आला होता. पण त्याने ही बाब बोर्डाच्या अधिकाऱ्यांना सांगितली नव्हती, त्यामुळे त्याला दणका देण्यात आला आहे.