भारत आणि बांगलादेशदरम्यान क्रिकेट सामना झाल्यानंतर वाद झाला नाही अशी शक्यता फारच कमी असते. टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत बुधवारी भारताने बांगलादेशचा पाच धावांनी पराभव केल्यानंतर विराट कोहलीवर होत असलेल्या आरोपाची चर्चा आहे. बांगलादेशचा यष्टीरक्षक नुरुल हसनने विराट कोहलीवर खोटं क्षेत्ररक्षण म्हणजेच फेक फिल्डिंगचा आरोप केला आहे. यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली असून दोन्ही संघाचे चाहते बाजू मांडत आहे. समालोचक हर्षा भोगले यांनाही या वादावर भाष्य केलं असून बांगलादेश संघाला पराभवासाठी कारणं शोधू नका असं सुनावलं आहे.

नुरुलने शेवटच्या षटकात अर्शदीप सिंगला एक चौकार आणि षटकार लगावत विजयाच्या आशा कायम ठेवल्या होत्या. पण पाच धावांनी त्यांनी हा सामना गमावला आणि सोबत उपांत्यफेरीत पोहोचण्याची शक्यताही धुसर झाली आहे. “पावसामुळे नक्कीच आमच्या खेळावर परिणाम झाला. पण यावेळी एक खोटा थ्रो करण्यात आला, ज्यामुळे आम्हाला पाच अतिरिक्त धावा मिळाल्या असत्या,” असं नुरुलने म्हटलं आहे.

नेमकं काय झालं?

नुरुल ज्या क्षणाचा उल्लेख करत आहे तेव्हा सातवं षटक टाकलं जात होतं. अर्शदीपने यष्टीरक्षक दिनेश कार्तिककडे चेंडू फेकलेला असताना विराट कोहलीने आपल्या हातात चेंडू आला असून गोलंदाजाच्या दिशेने रन आऊटसाठी फेकत असल्याचं खोटं नाटक केलं होतं.

विश्लेषण: भारताने बांगलादेशविरुद्ध विजय कसा खेचून आणला? उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित का?

हर्षा भोगले यांनी वाद वाढत असल्याचं पाहत ट्वीट केलं असून बांगलादेश संघाला नियमम समजावून सांगितला आहे. “खरं तर खोटं क्षेत्ररक्षण झाल्याचा तो प्रकार कोणीच पाहिला नाही. अम्पायर, फलंदाज किंवा आम्ही कोणीच पाहिलं नाही. आयसीसी नियम ४.१५ नुसार क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला दंड होऊ शकतो (अम्पायरने त्याची दखल घ्यावी लागते). पण कोणीही पाहिलं नाही. मग तुम्ही काय करणार,” अशी विचारणा हर्षा भोगले यांनी केली आहे.

IND vs BAN: पराभवानंतर बांगलादेशच्या खेळाडूचा विराट कोहलीवर गंभीर आरोप, म्हणाला “मैदानात खोटं…”

“मैदान ओलं होतं अशी तक्रार कोणी करु शकत नाही. फलंदाजांना त्याचा फायदा व्हायला हवा होता हे शाकिबचं म्हणणं योग्य आहे. खेळ रद्द करणं शक्य नाही तोपर्यंत अम्पायर आणि क्युरेटर्सना प्रयत्न करावे लागतात. आणि त्यांनी योग्यप्रकारे स्थिती हाताळली ज्यामुळे कमीत कमी वेळ वाया गेला,” असंही हर्षा भोगले म्हणाले आहेत.

“त्यामुळे बांगलादेशमधील माझ्या मित्रांना, कृपया फेक फिल्डिंग किंवा पावसानंतरची स्थिती या कारणांचा आधार घेत पराभव झाल्याचं सांगू नका. जर एकही फलंदाज शेवटपर्यंत टिकला असता तर तुम्ही जिंकला असतात. जेव्हा आपण कारणं शोधतो, तेव्हा आपण मोठे होत नाही,” असंही त्यांनी सुनावलं.

आयसीसी नियम काय सांगतो?

आयसीसी नियम क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला जाणूनबुजून लक्ष विचलित करणं, फसवणूक करणं किंवा फलंदाजाला अडथळा करण्यापासून प्रतिबंधित करतो. जर पंचांना असं झाल्याचं आढळलं तर ते डेड बॉल जाहीर करु शकतात किंवा पाच पेनाल्टी धावा देऊ शकतात.

Story img Loader