IND vs ENG 1st ODI Updates in Marathi: भारत वि इंग्लंड वनडे मालिकेला सुरूवात झाली आहे. पहिला वनडे सामना नागपुरात खेळवला जात आहे. प्रथम फलंदाजी करत इंग्लंड संघाने २४८ धावा केल्या आणि ४७ षटकांत सर्वबाद झाला. या सामन्यात भारताकडून दोन खेळाडूंनी वनडेमध्ये पदार्पण केलं आहे. टी-२० आणि कसोटीमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या यशस्वी जैस्वाल आणि हर्षित राणाला संधी मिळाली. हर्षित राणा पदार्पण करताच एक नकोसा विक्रम आपल्या नावे केला. पण यानंतर ३ विकेट्स घेत त्याने त्याने इतिहास घडवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हर्षित राणाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताच तिसऱ्याच षटकात तब्बल २६ धावा दिल्या होत्या. अशा प्रकारे, तो एकदिवसीय पदार्पणात एका षटकात सर्वाधिक धावा देणारा भारतीय गोलंदाज ठरला. पण यानंतर त्याने उत्कृष्ट पदार्पण करत एकाच षटकात दोन विकेट्स घेत महत्त्वपूर्ण कामगिरी केली.

नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने मोहम्मद शमीसह नवोदित हर्षित राणावर गोलंदाजी जबाबदारी दिली. शमीने पहिले षटक टाकले आणि त्यानंतर पदार्पणाच्या सामन्यात हर्षित राणा प्रथम गोलंदाजी करण्यासाठी आला ज्यामध्ये त्याने ११ धावा दिल्या. यानंतर राणाने दुसरं मेडन षटक टाकत पुनरागमन केलं. मात्र, त्याच्या तिसऱ्या षटकात धावांचा पाऊस पडला. या षटकात हर्षित राणाच्या गोलंदाजीवर फिल सॉल्टने चौकार-षटाकारांचा पाऊल पाडला. या षटकात सॉल्टने तीन षटकार आणि दोन चौकार लगावत २६ धावा केल्या. यासह, तो आपल्या पदार्पणाच्या एकदिवसीय सामन्यात एका षटकात सर्वाधिक धावा देणारा भारतीय गोलंदाज बनला.

हर्षित राणाने या लाजिरवाण्या षटकानंतर शानदार पुनरागमन करत चौथ्या षटकात २ विकेट घेत खळबळ उडवून दिली. हर्षित राणाने आपल्या चौथ्या षटकात प्रथम बेन डकेटला झेलबाद केले आणि त्यानंतर हॅरी ब्रूकला शून्यावर बाद केले. यानंतर लियाम लिव्हिंगस्टोन ५ धावांवर बाद झाला. अशाप्रकारे हर्षित राणाने भारताच्या एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात एक मोठा इतिहास घडवला आहे.

हर्षित राणा हा तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पणाच्या सामन्यात तीन आणि तीनपेक्षा जास्त विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी, त्याने ऑस्ट्रेलियात पदार्पणाच्या कसोटीत ४८ धावांत ३ विकेट घेतले होते, तर पुण्यात टी-२० मध्ये पदार्पण करताना त्याने ३३ धावांत ३ विकेट घेतले होते. आता त्याने एकदिवसीय पदार्पणातही असाच पराक्रम करून नवा इतिहास लिहिला आहे.

हर्षित राणाची तिन्ही फॉरमॅटच्या पदार्पणातील कामगिरी

कसोटी : ४८ धावा देत ३ विकेट वि. ऑस्ट्रेलिया, पर्थ
टी-२० : ३३ धावा देत ३ विकेट वि. इंग्लंड, पुणे<br>वनडे: ५३ धावा देत ३ विकेट वि. इंग्लंड, नागपूर</p>