Harshit Rana 1st Test Wicket in IND vs AUS 1st Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात टीम इंडियाकडून दोन खेळाडूंनी पदार्पण केले. ज्यामध्ये नितीश कुमार रेड्डी आणि हर्षित राणा यांच्या नावाचा समावेश आहे. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाचा पहिला डाव १५० धावांवर गारद झाली. यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांवर मोठी जबाबदारी येऊन पडली होती. प्रत्युत्तरात भारतीय गोलंदाजांनीही चोख प्रत्युत्तर दिले. दरम्यान, हर्षित राणाने दमदार शैलीत पदार्पण करताना आपल्या पहिल्या कसोटी विकेट्सच्या रुपाने ट्रॅव्हिस हेडला बाद केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑस्ट्रेलियाला ३१ धावांवर चौथा धक्का बसला. पदार्पण करणाऱ्या हर्षित राणाने ट्रॅव्हिस हेडला क्लीन बोल्ड केले. त्याला १३ चेंडूत ११ धावा करता आल्या. यापूर्वी जसप्रीत बुमराहने नॅथन मॅकस्विनी, उस्मान ख्वाजा आणि स्टीव्ह स्मिथला बाद केले होते. गेल्या एका वर्षात टीम इंडियाला सर्वात जास्त वेदना कोणत्याही ऑस्ट्रेलियन खेळाडूने दिल्या असतील, तर तो खेळाडू दुसरा कोणी नसून ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड आहे.

ट्रॅव्हिस हेडमुळे टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ आणि एकदिवसीय वर्ल्ड कपची अंतिम फेरी गमावली. अशा परिस्थितीत बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये त्याची विकेट टीम इंडियासाठी खूप महत्त्वाची होती. राणाने टीम इंडियासाठी ही महत्त्वाची विकेट घेतली. त्याने भारताचा सर्वात मोठा शत्रू म्हटल्या जाणाऱ्या ट्रॅव्हिस हेडला त्याची पहिली आंतरराष्ट्रीय विकेट म्हणून बाद केले. भारतीय संघासाठी हेडची विकेट सर्वात महत्त्वाची होती. या सामन्यातही हेड चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे दिसत होते. त्यामुळे त्याची विकेट टीम इंडियासाठी आवश्यक झाली होती.

हेही वाचा – KL Rahul : केएल राहुलने २६ धावा करूनही केला मोठा पराक्रम, कसोटीत पार केला खास टप्पा

राणा आणि हेड एकमेकांकडे बघत राहिले –

या सामन्यादरम्यान राणा आणि हेड एकमेकांकडे रागाने पाहात होते. जेव्हा हेडने त्याला एकाच षटकात दोन चौकार मारले. पुढच्याच षटकात राणाने त्याला आपला बळी बनवले आणि हेड केवळ ११ धावा काढून बाद झाला. त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harshit rana takes first test wicket to dismissing travis head video viral during ind vs aus 1st test at perth test vbm