Paris Paralympics 2024 India Medal Tally: पॅरिस येथे सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय पॅरा ॲथलीट सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करताना दिसत आहेत. ४ सप्टेंबर म्हणजेच सातव्या दिवशी भारताने दोन सुवर्णपदके आणि २ रौप्यपदक पटकावली आहेत. भारताने पहिल्यांदाच पॅरा तिरंदाजी आणि क्लब थ्रोमध्ये सुवर्णकामगिरी केली तर गोळाफेकमध्ये भारताने ४० वर्षांनंतर पदक पटकावले.

मराठमोळ्या सचिन खिलारीने सातव्या दिवशी पदकांचा सिलसिला सुरू केला. भारताच्या सचिन खिलारीने पुरुषांच्या गोळाफेक F46 प्रकारात रौप्य पदक जिंकले आहे. यानंतर भारताच्या हरविंदर सिंहने पॅरा तिरंदाजी सिंगल्समध्ये सुवर्णपदक पटकावले. तर भारताच्या धर्मबीरने क्लब थ्रोच्या F51 प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे. याच स्पर्धेत प्रणव सुरमाने रौप्यपदक पटकावले आहे.

maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
Shivaji Park ground, Shivaji Park, MNS Shivaji Park,
शिवाजी पार्कचे मैदानाचा निर्णय गुलदस्त्यात, महायुतीने मैदान अडवल्यामुळे ४५ दिवसांची मर्यादा संपल्याचा मनसेचा आरोप
India vs South Africa 2nd T20 Highlights in Marathi
IND vs SA 2nd T20I Highlights : रोमांचक सामन्यात यजमानांनी हिरावला भारताच्या तोंडचा घास, ट्रिस्टन स्टब्सच्या वादळी खेळीने फेरले वरुण चक्रवर्तीच्या मेहनतीवर पाणी
AUS vs PAK Pakistan beat Australia by 8 wickets in the third ODI match
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात फडकावला झेंडा, वर्ल्ड चॅम्पियन संघाला घरच्या मैदानावर पाजलं पाणी
washim assembly constituency dispute within mahayuti
महायुतीमध्ये असंतोषाची दरी, बंडखोरीमुळे वाशीम जिल्ह्यात वाद वाढले; कारवाईत पक्षपातीपणा?
shams mulani
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा: मुंबईकडून ओडिशाचा डावाने धुव्वा

हेही वाचा – Sachin Sarjerao Khilari: मराठमोळ्या सचिन खिलारीने पॅरिसमध्ये घडवला इतिहास, ४० वर्षांनी गोळाफेकमध्ये भारताला मिळवून दिले पदक

सचिन खिलारी – गोळाफेक रौप्यपदक

सचिन खिलारीने पुरुषांच्या गोळाफेक F46 प्रकारात रौप्य पदक जिंकले आहे. या रौप्य पदकासह, सचिन ४० वर्षांत पॅरालिम्पिकमध्ये गोळाफेक प्रकारात पदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. यापूर्वी १९८४ मध्ये भारताने पुरुषांच्या गोळाफेकमध्ये पहिले पदक जिंकले होते. आपल्या क्रीडा कौशल्यासोबतच मेकॅनिकल इंजिनीयर म्हणून शैक्षणिक क्षेत्रातही यश संपादन केले आहे. तो वेगवेगळ्या संस्थांमध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून काम करतो, विद्यार्थ्यांना त्यांच्या MPSC आणि UPSC परीक्षेच्या तयारीत मदत करतो.

हेही वाचा – Paris Paralympics 2024: भारताची पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये रेकॉर्डब्रेक कामगिरी, अवघ्या सहा दिवसांत सर्वाधिक पदकं जिंकण्याचा केला विक्रम

हरविंदर सिंह पटकावलं भारतासाठी तिरंदाजीतील पहिलं पदक

हरविंदर सिंहने तिरंदाजीत सुवर्णपदक जिंकण्यात यश मिळविले आहे. हरविंदरने पुरुषांच्या वैयक्तिक रिकर्व्ह सुवर्णपदकाच्या अंतिम सामन्यात पोलंडचा पॅरा ॲथलीट लुकास सिझेक याचा सलग तीन सेटमध्ये पराभव करून पदक जिंकण्यात यश मिळविले. पॅरिस ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकमधील तिरंदाजीमधील भारताचे हे पहिले पदक आहे.

हरविंदर सिंगची चमकदार कामगिरी सुवर्णपदकाच्या सामन्यात पाहायला मिळाली. ज्यात त्याने पहिला सेट २८-२४ अशा गुणफरकाने जिंकला आणि २ महत्त्वाचे गुण मिळवले. यानंतर दुसऱ्या सेटमध्ये हरविंदरने पुन्हा २८ गुण मिळवले आणि प्रतिस्पर्धी २७ गुण मिळवून पिछाडीवर राहिला, त्यामुळे हा सेटही हरविंदरच्या नावावर राहिला आणि त्याने ४-० अशी आघाडी घेतली. तिसऱ्या सेटमध्ये हरविंदरने २९-२५ अशा फरकाने विजय मिळवत २ गुण जमा केले आणि ६-० ने पराभूत करून सुवर्णपदक जिंकण्यात यश मिळविले.

हेही वाचा – Duleep Trophy 2024: भारतात जन्म अन् इंग्लंडकडून खेळले आंतरराष्ट्रीय क्रिकेट, कोण आहेत दुलीप सिंह? ज्यांच्या नावे भारतात खेळवली जाते मोठी देशांतर्गत स्पर्धा

धर्मबीर – क्लब थ्रो सुवर्णपदक

भारताच्या धर्मबीरने क्लब थ्रोच्या F51 प्रकारात सुवर्णपदक जिंकले. धर्मबीरची सुरुवात खूपच खराब झाली. जेव्हा त्याचे पहिले चार थ्रो फाऊल होते. त्यानंतर पाचव्या थ्रोमध्ये त्याने आपला सर्व अनुभव आणि ताकद वापरून ३४.९२ मीटर अंतरापर्यंत थ्रो केला, जो त्याच्या सर्वात्कृष्ट थ्रो ठरला. यानंतर त्याने ३१.५९ मीटरचा सहावा थ्रो केला. ३४.९२ मीटरच्या उत्कृष्ट थ्रोसह सुवर्णपदकाला गवसणी घातली.

हेही वाचा – PAK vs BAN: “हा एक वाईट संकेत आहे…” फक्त खेळाडू नाही तर PCB वरही भडकले पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू; जावेद मियांदाद, इंजमाम यांच्या वक्तव्याने वेधले लक्ष

प्रणव सुरमा – क्लब थ्रो रौप्यपदक

प्रणव सुरमाने याच स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. भारताने पहिल्यांदाच क्लब थ्रोमध्ये पदक पटकावले आहे आणि भारताच्या दोन खेळाडूंना सुवर्ण आणि रौप्य कामगिरी करता आली. प्रणवने पहिला थ्रो ३४.५९ मीटर, दुसरा थ्रो ३४.१९ मीटर केला. त्याचा तिसरा थ्रो फाऊल होता. उरलेल्या तीन थ्रोमध्येही तो पहिल्या प्रयत्नात पोहोचू शकला नाही. त्याच्या पहिल्याच थ्रोमुळे त्याला रौप्यपदक मिळाले. धरमवीर आणि प्रणव सुरमा यांनी क्लब थ्रोच्या F51 प्रकाराच्या अंतिम फेरीत पदक जिंकण्यात यश मिळविले.

भारताच्या खात्यात २४ पदकं

Paris Paralympic 2024 मध्ये भारताने आतापर्यंत एकूण २४ पदकं जिंकली आहेत, ज्यात ५ सुवर्ण, ९ रौप्य आणि १० कांस्य पदकांचा समावेश आहे. भारताने टोकियो पॅरालिम्पिकचा सुवर्णपदकाच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. भारताने टोकियोमध्येही पाच सुवर्णपदकं जिंकली. सध्याच्या पॅरालिम्पिकमध्ये भारत पदकतालिकेत १३ व्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत अवनी लेखरा (नेमबाजी), नितेश कुमार (बॅडमिंटन), सुमित अंतिल (भालाफेक), हरविंदर सिंग (तिरंदाजी) आणि धर्मबीर (क्लब थ्रो) यांनी भारतासाठी सुवर्णपदके जिंकली आहेत.