Hasan Ali Injured by Generator Celebration : पाकिस्तान क्रिकेट संघाचे खेळाडू सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यापैकी एक खेळाडू म्हणजे वेगवान गोलंदाज हसन अली, जो त्याच्या गोलंदाजीसह विचित्र कृत्यांसाठी देखील ओळखला जातो. हसन अली त्याच्या सेलिब्रेशनसाठी खूप प्रसिद्ध आहे. २०१८ मध्येही झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात हसन अलीने विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेशन करताना जखमी झाला होता. सेलिब्रेशनमुळे त्याच्या खांद्याला त्रास झाला होता. आता पुन्हा एकदा हसन अलीसोबत असे घडले आहे. यावेळी त्याच्या बरगड्यांना दुखापत झाली आहे, ज्याचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.

हसन अलीच्या बरगड्यांना दुखापत –

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेला २ जूनपासून सुरुवात झाली आहे. मात्र, या स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या संघात हसन अलीला स्थान मिळालेले नाही. त्यामुळे तो सध्या खेळल्या जात असलेल्या टी-२० ब्लास्टमध्ये वॉर्विकशायरकडून खेळत आहे. या स्पर्धेत नॉटिंगहॅमशायरविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात हसन अलीने विकेट घेतल्यानंतर आपले प्रसिद्ध ‘जनरेटर’ सेलिब्रेशन केले, जे त्याला चांगलेच महागात पडले. या सेलिब्रेशनमुळे हसन अलीच्या बरगड्यांना वेदना झाल्या.

Bollywood Artists News, Marathi news
Saif Ali Khan Attack : सैफ अली खानच नाही तर सलमान खान, रवीना टंडन यांच्यासह ‘या’ कलाकारांवरही झाला होता हल्ला
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
kareena Kapoor video last night from recidence after the incident
Video: पतीवर झालेल्या हल्ल्याने करीना कपूर चिंतेत; घटनेनंतर घराबाहेरील पहिला व्हिडीओ आला समोर
Son Ibrahim Ali Khan Rushed Saif Ali Khan To Hospital
वडिलांसाठी मध्यरात्री धावून आला इब्राहिम अली खान; हल्ल्यानंतर जखमी सैफला रुग्णालयात केलं दाखल, नेमकं काय घडलं?
Saif Ali Khan attacked by intruder at bandra home
अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, वांद्रेतील घरात मध्यरात्री घडली घटना
Gautam Gambhir Angry on Morne Morkel in Australia for turning up late at training IND vs AUS
Team India: गौतम गंभीर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मॉर्ने मॉर्कलवर संतापला, नेमकं काय घडलं होतं? प्रकरण आलं समोर
BPL 2025 Mohammad Nawaz and Tanzim Hasan fight during Khulna Tigers vs Sylhet Strikers match
BPL 2025 : लाइव्ह मॅचमध्ये बांगलादेश आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये जुंपली, वाद घालतानाचा VIDEO व्हायरल
Fan who caught Kane Williamson's sixer with one hand wins Rs 90 lakh prize in SA20 2025 Match
SA20 2025 : मॅच पाहायला गेला आणि लखपती झाला, केन विल्यमसनच्या षटकाराने चाहत्याचं नशीब कसं बदललं?

हसन अलीला दुखापत झाल्याचा व्हिडीओ व्हायरल –

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पाकिस्तानी वेगवान गोलंदाज प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला यॉर्कर चेंडू टाकून क्लीन बोल्ड करतो. यानंतर तो नेहमीप्रमाणे आपले जनरेटर सेलिब्रेशन करायला सुरुवात करताच त्याच्या बरगड्यांना त्रास होताना दिसत आहे. ज्यामुळे हसन अली खूपच अस्वस्थ दिसत आहे. २०१८ मध्येही त्याच्यासोबत असेच घडले होते, तेव्हा त्याच्या खांद्याला त्रास झाला होता. या सामन्यात हसन अलीने नॉटिंगहॅमशायरच्या ऑली स्टोनला बोल्ड केले, जो केवळ ३ धावा करून बाद झाला.

हेही वाचा – T20 World Cup 2024 : अफगाणिस्तानने उडवला युगांडाचा धुव्वा; ५ विकेट्ससह फारुकी चमकला

सामन्यात हसन अलीच्या संघाने मारली बाजी –

वॉर्विकशायर आणि नॉटिंगहॅमशायर यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात हसन अलीच्या संघाने म्हणजेच वॉर्विकशायरने २२ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना वॉर्विकशायर संघ २० षटकांत १९.३ षटकांत सर्वबाद १४९ धावांत आटोपला. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना नॉटिंगहॅमशायरचा संघ १९.२ षटकांत १२७ धावांत सर्वबाद झाला.

Story img Loader