Who is Hasan Mahmud 3 Wickets in IND vs BAN 1st Test: भारत आणि बांगलादेश यांच्यात चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात बांगलादेशच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजसाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. २ षटकात भारताने केवळ २ धावा केल्या आहेत. यानंतर खेळपट्टीही गोलंदाजीला साध देणारी असल्याने फलंदाज धावा करण्यासाठी खूप मेहनत घेत होते. अशातच बांगलादेशचा तरूण गोलंदाज हसन महमूदने उत्कृष्ट गोलंदाजी करत भारताच्या टॉप-३ फलंदाजांना बाद केले. पण हा नवा गोलंदाज हसन महमूद नेमका आहे तरी कोण, जाणून घ्या.

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडिया नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आली. भारतीय डावाची सुरूवात रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वालच्या जोडीने केली. हे दोन्ही फलंदाज चांगली सुरूवात करून देत मोठी धावसंख्या उभारतील, अशी आशा होती. पण, वेगवान गोलंदाज हसन महमूद गोलंदाजीसाठी आला आणि त्याने भारताला धक्के द्यायला सुरूवात केली. या वेगवान गोलंदाजाने प्रथम रोहित शर्माला ६ धावांवर बाद केले, त्यानंतर शुभमन गिलला शून्यावर बाद केले, त्यानंतर विराट कोहलीला ६ धावांवर बाद करून भारताला तीन मोठे धक्के दिले. त्यामुळे भारताची सुरुवात खूपच खराब झाली आणि ३४ धावांत ३महत्त्वाचे विकेट गमावले.

Yashasvi Jaiswal surpassed Ben Duckett in WTC 2025
IND vs BAN 1st Test : यशस्वी जैस्वालने बेन डकेटला मागे टाकत केला खास पराक्रम, WTC 2025 मध्ये पटकावले दुसरे स्थान
19th rashibhavishya in marathi
१९ सप्टेंबर पंचांग: वृद्धी योग राशीच्या कुंडलीत बदल…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
The flight from Kathmandu to Delhi was hijacked on December 24, 1999.
IC814 Hijacking Case: पाकिस्तानला कॉल आणि ठाकरेंच्या ‘मातोश्री’ला लक्ष्य करण्याची योजना: मुंबई पोलिसांनी IC814 अपहरण प्रकरणाचा शोध नेमका घेतला कसा?
Sunil Gavaskar slams Michael Vaughan for comment on Test cricket
Sunil Gavaskar Michael Vaughan : कसोटीत रुटने सचिनला मागे टाकले तर काय बदलेल? मायकेल वॉनच्या वक्तव्याला सुनील गावसकरांनी दिले चोख प्रत्युत्तर
Rishabh Pant Litton Das Heated Argument In IND vs BAN 1st Test
Rishabh Pant: “मला रोखून चेंडू का मारतो आहेस…”, ऋषभ पंत आणि लिट्टन दास मैदानातच भिडले, पाहा VIDEO

हेही वाचा – IND vs BAN Live Streaming: ना सोनी, ना स्टार, या चॅनेलवर पाहता येईल भारत-बांगलादेश मालिकेचं थेट प्रक्षेपण

IND vs BAN: कोण आहे हसन महमूद? (Who is Hasan Mahmud?)

बांगलादेशचा तरूण गोलंदाज हसन महमूदने गोलंदाजीला येताच आपल्या भेदक आणि अचूक गोलंदाजीने भारतीय फलंदाजांना त्रास देण्यास सुरूवात केली. महमूद हसनने मार्च २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या चार वर्षांत, हसनने बांगलादेशसाठी फक्त पांढऱ्या चेंडूचे क्रिकेट खेळले आणि त्याने संघ व्यवस्थापनाला इतके प्रभावित केले की त्याला राष्ट्रीय संघात खेळण्याची संधी मिळाली.

हसनने या वर्षाच्या सुरुवातीला श्रीलंकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. हसन महमूदने ऑगस्टमध्ये बांगलादेशने पाकिस्तानविरुद्धच्या ऐतिहासिक मालिका विजयादरम्यान कसोटीत प्रथमच ५ विकेट घेत जबरदस्त कामगिरी केली. आतापर्यंत त्याने तीन सामन्यांत २५ च्या सरासरीने १४ विकेट घेतले आहेत. हसनच्या नावावर २२ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३० विकेट आहेत आणि २२ टी-२० सामन्यात १८ विकेट आहेत. हा तरूण खेळाडू त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसह क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो. हसन महमूद ताशी १४० किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करतो. त्याला लक्ष्मीपूर एक्सप्रेस म्हणूनही ओळखले जाते.

हेही वाचा – IND vs BAN 1st Test : यशस्वी जैस्वालने बेन डकेटला मागे टाकत केला खास पराक्रम, WTC 2025 मध्ये पटकावले दुसरे स्थान

भारत-बांगलादेश पहिल्या कसोटीचा लंच ब्रेक झाला असून भारताने लंच ब्रेकपर्यंत ३ बाद ८८ धावा केल्या आहेत. झटपट तीन विकेट गमावल्यानंतर भारताकडून यशस्वी आणि ऋषभ पंत भारताचा डाव सावरला आणि चांगली भागीदारी रचली आहे. यशस्वी जैस्वाल ३७ धावा तर पंत ३३ धावा करत नाबाद आहेत.

हेही वाचा – IND vs BAN: रोहित शर्मा टी-२० मधून निवृत्तीचा निर्णय मागे घेणार? कर्णधाराने दिले उत्तर

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन


भारतीय क्रिकेट संघ

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप, मोहम्मद सिराज.

बांगलादेश क्रिकेट संघ :

शादमान इस्लाम, झाकीर हसन, नझमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन दास (यष्टीरक्षक), मेहदी हसन मिराज, तस्किन अहमद, हसन महमूद, नाहिद राणा.