Hasan Raza ON DRS: विश्वचषक २०२३ च्या ३७व्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा २४३ धावांनी पराभव केला आणि या स्पर्धेत सलग आठवा विजय नोंदवला. ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर ३२७ धावांचे लक्ष्य ठेवले होते, ज्याचा पाठलाग करताना विरोधी संघ अवघ्या ८३ धावांवर गडगडला. भारताच्या सलग विजयांवर पाकिस्तानचा माजी क्रिकेटर हसन रझाने पुन्हा एकदा टीम इंडियावर निशाणा साधला आहे. त्याने संघावर डीआरएसमध्ये फेरफार केल्याचा आरोप केला आहे.

डीआरएसमध्ये फेरफार केल्याचा आरोप

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू हसन रझा २०२३च्या विश्वचषकाचे आयोजन करणाऱ्या टीम इंडियावर सातत्याने आरोप करत आहे. दक्षिण आफ्रिकेवर भारताच्या विजयानंतर हसन रझा म्हणाला की, “टीम इंडियाच्या विजयामागे डीआरएसमधील हेराफेरी हे प्रमुख कारण आहे.” आपला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी त्याने रॅसी व्हॅन डेर ड्युसेन सामन्यात कसा बाद झाला याचे उदाहरण दिले.

India wins the match as well as the series against South Africa
भारताचा दणदणीत विजय; तिलक वर्मा व संजू सॅमसनची धमाकेदार कामगिरी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Tilak Varma Statement on Maiden T20I Century Flying Kiss Celebration He Said It is For Suryakumar Yadav Gives credit to him IND vs SA
IND vs SA: तिलक वर्माने शतकानंतर कोणाला फ्लाईंग किस दिला? सामन्यानंतर स्वत:च सांगितलं…
KL Rahul Statement on Sanjiv Goenka Animated Chat in IPL 2024 loss Said Wasn’t the nicest thing Ahead
KL Rahul: “मैदानावर जे काही घडलं ते फार चांगलं…”, संजीव गोयंका भर मैदानात भडकल्याच्या घटनेवर केएल राहुलने पहिल्यांदाच केलं वक्तव्य
Mohammad Rizwan Says I am only a captain for toss and presentation
Mohammad Rizwan : ‘मी फक्त टॉस आणि प्रेझेंटेशनसाठी कर्णधार…’, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर मोहम्मद रिझवानचे मोठे वक्तव्य
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’
Champions Trophy Mohammed Hafeez Big Statement About India wont travel to Pakistan Said Somehow Not Secure for India
Champions Trophy: “भारतीय संघासाठी पाकिस्तान सुरक्षित नाही…”, पाकिस्तानच्या माजी खेळाडूच्या पोस्टने उडाली खळबळ, PCBला दाखवला आरसा

रझा म्हणाला, “रवींद्र जडेजाने पाच विकेट्स घेतल्या, ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी होती. आम्ही येथे तंत्रज्ञानाबद्दल बोलत आहोत जिथे डीआरएस घेतले जाते. व्हॅन डर डुसेन हा एक उत्तम फलंदाज आहे आणि चेंडू लेग स्टंपच्या लाईनमध्ये पडला आणि तिथून त्याने फिरकी घेत सरळ जाऊन लेग आणि मिडल स्टंपला धडकला. हे कसे शक्य आहे? मुळात तो चेंडूचा अर्धा भाग हा पिच ऑफ द लेगसाईडला पडला होता. त्यात तिथून चेंडू फिरकी घेत लेग स्टंपच्या दिशेने गेला. हे शक्यच नाही.”

हसन पुढे म्हणाला, “मी फक्त माझे मत मांडत आहे. मी म्हणतोय की या गोष्टी तपासल्या पाहिजेत. डीआरएसमध्ये फेरफार होत असून ते स्पष्टपणे दिसत आहे.” भारताने विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात डीआरएसमध्ये फेरफार केल्याचा दावाही रझा यांनी केला. तो म्हणाला, “ही काही पहिलीच वेळ नाही. पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात आणि शेवटच्या भागीदारीदरम्यानही असे घडले होते. याबद्दल त्यांनी माफीही मागितली नाही. मायदेशातील परिस्थिती आणि त्याचे फायदे इथे महत्त्वाचे आहेत. सध्या टीम इंडियाला पाठिशी घातलं जात आहे.”

हेही वाचा: IND vs SA: ना जडेजा ना के.एल. प्रशिक्षकाच्या पसंतीस पडला रोहित शर्मा, एकही झेल न घेता सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला हिटमॅन; पाहा Video

डीआरएस या घटनेआधीही रझा याने दुसऱ्या डावात बीसीसीआय आणि आयसीसी भारतीय गोलंदाजांना वेगवेगळे चेंडू देत असल्याचा आरोप केला होता. चेंडूची तपासणी करणे आवश्यक असल्याचा आरोपही त्याने केला. स्विंगसाठी बॉलवर कोटिंगचा अतिरिक्त थर देखील असू शकतो. २०११च्या विश्वचषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा संदर्भ देताना माजी क्रिकेटपटू म्हणाला की, “त्या काळात देखील डीआरएसमध्ये फेरफार करण्यात आला होता. म्हणून भारताने २०११मध्ये विश्वचषक जिंकला होता.