साऊथ आफ्रिका क्रिकेट मंडळातर्फे दिल्या जाणाऱ्या वार्षिक पुरस्कारांमध्ये हशिम अमलाला वर्षांतील सवरेत्कृष्ट क्रिकेटपटू हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या पुरस्कारासह अमलाने वर्षांतील सवरेत्कृष्ट कसोटीपटू, प्रेक्षक पसंती पुरस्कार तसेच इंग्लंडमधील त्रिशतकासाठी ‘सो गुड’ पुरस्कारावर नाव कोरले. याआधी २०१०मध्ये अमला वर्षांतील सवरेत्कृष्ट क्रिकेटपटू पुरस्काराचा मानकरी ठरला होता. कारकिर्दीत दोनदा या पुरस्कावर मोहोर उमटवणारा अमला हा मखाय एनटिनी आणि जॅक कॅलिस यांच्यानंतरचा तिसरा खेळाडू आहे. ए. बी. डी’व्हिलियर्सची सवरेत्कृष्ट एकदिवसीय खेळाडू म्हणून तर डेल स्टेनला सवरेत्कृष्ट ट्वेन्टी-२० खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात आले.
हशिम अमलाला सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार
साऊथ आफ्रिका क्रिकेट मंडळातर्फे दिल्या जाणाऱ्या वार्षिक पुरस्कारांमध्ये हशिम अमलाला वर्षांतील सवरेत्कृष्ट क्रिकेटपटू हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
First published on: 11-09-2013 at 12:57 IST
TOPICSहाशिम आमला
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hashim amla in records book for bagging cricketer of the year twice