साऊथ आफ्रिका क्रिकेट मंडळातर्फे दिल्या जाणाऱ्या वार्षिक पुरस्कारांमध्ये हशिम अमलाला वर्षांतील सवरेत्कृष्ट क्रिकेटपटू हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या पुरस्कारासह अमलाने वर्षांतील सवरेत्कृष्ट कसोटीपटू, प्रेक्षक पसंती पुरस्कार तसेच इंग्लंडमधील त्रिशतकासाठी ‘सो गुड’ पुरस्कारावर नाव कोरले. याआधी २०१०मध्ये अमला वर्षांतील सवरेत्कृष्ट क्रिकेटपटू पुरस्काराचा मानकरी ठरला होता. कारकिर्दीत दोनदा या पुरस्कावर मोहोर उमटवणारा अमला हा मखाय एनटिनी आणि जॅक कॅलिस यांच्यानंतरचा तिसरा खेळाडू आहे. ए. बी. डी’व्हिलियर्सची सवरेत्कृष्ट एकदिवसीय खेळाडू म्हणून तर डेल स्टेनला सवरेत्कृष्ट ट्वेन्टी-२० खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा