इंग्लंडच्या ६२९ धावांसमोर खेळताना, केप टाऊन कसोटीत दक्षिण आफ्रिकेने कर्णधार हशीम अमलाचे द्विशतक आणि तेंबा बावूमाच्या अर्धशतकाच्या बळावर ७ बाद ६२७ धावसंख्येवर डाव घोषित केला. अमलाने तब्बल अकरा तास खेळपट्टीवर ठाण मांडताना २७ चौकारांसह खेळताना २०१ धावांची खेळी साकारली. बावूमाने १६ चौकारांसह खेळताना नाबाद १०२ धावा केल्या. फॅफ डू प्लेसिस (८८) तर ख्रिस मॉरिस (६९) यांनी उपयुक्त योगदान दिले. चौथ्या दिवसअखेर इंग्लंडने दुसऱ्या डावात बिनबाद १६ धावा केल्या आहेत. अ‍ॅलिस्टर कुक ८ तर अ‍ॅलेक्स हेल्स ५ धावांवर खेळत आहेत. इंग्लंडकडे १८ धावांची आघाडी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hashim amla scores third slowest double ton in test history with 682 minute effort against england