क्रिकेटपटू मोहम्मद शमीवर अत्यंत गंभीर स्वरुपाचे आरोप करणारी त्याची पत्नी हसीन जहाँ येत्या २३ मार्चला कोलकात्तामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेणार आहे. हसीन जहाँच्या आरोपानंतर शमीच्या वैवाहिक आयुष्यात वादळ उठले आहे. तिने शमीवर विवाहबाह्य संबंधांचे तसेच मानसिक छळ केल्याचे आरोप केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शमीचे सोशल मीडियावरील दुसऱ्या महिलेबरोबरच्या चॅटचे स्क्रिन शॉटचे तिने शेअर केले होते. या आरोपांमुळे शमीचा अद्याप बीसीसीआयच्या नव्या करारपत्रकात समावेश करण्यात आलेला नाही तसेच त्याच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान हसीन जहाँने ज्या पाकिस्तानी महिलेचा उल्लेख केला होता ती पाकिस्तानी महिला अलिश्बा अखेर समोर आली आहे. अलिश्बाने शमी दक्षिणआफ्रिका दौऱ्यावरुन परतत असताना आपण त्याला दुबईमध्ये भेटलो होतो असे सांगितले. इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी ट्रॉफी स्पर्धेपासून आपण शमीच्या संपर्कात आहोत असा दावा अलिश्बाने केला आहे.

या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता. शमीवर अनेक आरोप करणाऱ्या हसीन जहाँने शमी मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी असल्याचा आरोप केला होता. शमीने दुबईमध्ये एका महिलेची भेट घेतली ही महिला ब्रिटनहून एका माणसाने पाठवलेले पैसे त्याला देणार होती असा आरोप केला होता. शमीला ते पैसे तिने का दिले ते शमीने मला कधीही सांगितले नाही. पण तो मला फसवू शकतो तर देशालाही फसवेल असे हसनी जहाँने म्हटले होते.