Mohammad Kaif says Every club has bowlers like Ejaz Patel : न्यूझीलंडने फिरकी गोलंदाजांच्या जोरावर भारताविरुद्धचा मुंबईतील तिसरा कसोटी सामना जिंकला. मुंबईत झालेल्या या सामन्यात भारताला शेवटच्या डावात विजयासाठी १४७ धावांचे लक्ष्य होते. एजाज पटेल आणि ग्लेन फिलिप्ससमोर टीम इंडियाची दुसरा १२१ धावांवरच गारद झाला. एजाज इजाजने या सामन्यात एकूण ११ विकेट घेतल्या. त्याचवेळी पार्ट टाईम फिरकी गोलंदाज ग्लेन फिलिप्सनेही भारतीय फलंदाजांना खूप त्रास दिला. आता भारताचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने एजाच पटेलबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
एजाजबद्दल मोहम्मद कैफ काय म्हणाला?
मुंबई कसोटी न्यूझीलंडच्या विजयात एजाज पटेलने महत्त्वाची भूमिका बजावली. या कामगिरीनंतरही भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने एजाज पटेलच्या योगदानाने प्रभावित झालेला नाही. सोशल मीडियावरील एका व्हिडिओमध्ये कैफने सांगितले की, भारतातील प्रत्येक क्लबमध्ये या दर्जाचे गोलंदाज आहेत. कैफ म्हणाला, ‘एजाज पटेलने प्रभावित करणारी गोलंदाजी केली नाही. जर तुम्ही त्याचा पिच मॅप पाहिला तर त्याने दोन फुलटॉस, दोन शॉर्ट आणि दोन लेंथ बॉल टाकले, परंतु तरीही तो विकेट घेण्यात यशस्वी झाला.”
न्यूझीलंडचा अर्धवेळ (पार्ट-टाइम) फिरकीपटू ग्लेन फिलिप्सबद्दलही या माजी भारतीय फलंदाजाने असेच काहीसे सांगितले. मोहम्मद कैफ पुढे म्हणाला, “ग्लेन फिलिप्स हा अर्धवेळ गोलंदाज आहे आणि त्याला चांगली गोलंदाजी कशी करावी हे माहित नाही. आपण चांगल्या फिरकीपटूंकडून नाही तर अर्धवेळ गोलंदाजांकडून हरलो आहोत. एजाज पटेलने वानखेडे स्टेडियमवर २२ विकेट्स घेतल्याचे लोक म्हणतील. त्याला चेंडू नीट कसा टाकायचा हेही कळत नाही. एजाज पटेलने एका षटकात केवळ दोन चांगले चेंडू टाकले आणि विकेट्स घेतल्या. त्यामुळे शेवटच्या कसोटीतील पराभव लाजिरवाणा आहे.”
हेही वाचा – Virat Kohli Birthday : विराट कोहलीला वाढदिवसानिमित्त चाहत्याकडून मिळाले खास गिफ्ट, VIDEO होतोय व्हायरल
मोहम्मद कैफने मिचेल सँटनरचे केले कौतुक –
मोहम्मद कैफने पुणे कसोटीत ११ विकेट्स घेणारा न्यूझीलंडचा एकमेव फिरकी गोलंदाज मिचेल सँटनरचे कौतुक केले. दुखापतीमुळे सँटनर मालिकेतील शेवटचा सामना खेळू शकला नाही. डावखुऱ्या फिरकीपटूचे कौतुक करताना कैफ म्हणाला की, “सँटनरने चांगली गोलंदाजी केली. पुण्यात त्याने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली. ती कसोटी सामन्यातील उत्कृष्ट कामगिरी होती.”
भारताने मोडला ५० वर्षांपूर्वीचा नकोसा विक्रम –
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत आतापर्यंत भारतचे १३ खेळाडू शून्यावर बाद झाले असून, मुंबई कसोटी सामन्यात अजून एक डाव बाकी आहे आणि ही संख्या वाढू शकते. भारतीय संघासाठी, आतापर्यंतच्या क्रिकेटच्या इतिहासात तीन किंवा त्यापेक्षा कमी सामन्यांच्या कसोटी मालिकेत शून्यावर बाद होण्याची ही सर्वाधिक संख्या आहे. विशेष म्हणजे हा विक्रमही मायदेशात झाला आहे. यापूर्वी १९७४ मध्ये इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाचे १२ खेळाडू कसोटी मालिकेत शून्यावर बाद झाले होते. अशाप्रकारे आता हा विक्रम मोडीत निघाला असून रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आणखी एक लाजिरवाणा नवा विक्रम केला आहे.