Babar Azam being trolled by fans Video goes viral : पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर टी-२० मालिकेत पाकिस्तानचा पराभव झाला आहे. दुसरा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. दुसऱ्या सामन्यादरम्यान पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमची खिल्ली उडवली, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला १३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने नऊ गडी गमावून १४७ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ केवळ १३४ धावांवर गडगडला. दरम्यान या सामन्यात पाकिस्तान संघ क्षेत्ररक्षण करत असताना चाहत्यांनी बाबर आझमची खूप खिल्ली उडवली.

बाबर जेव्हा सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत होता, तेव्हा चाहते त्याच्या क्षेत्ररक्षणाची खिल्ली उडवत त्याला पाकिस्तानात परत जाण्यास सांगत होते. त्यापैकी एक चाहता बाबरला पंजाबी भाषेत म्हणाला, ” अरे, थोडी तरी लाज वाटू दे. टी-२० क्रिकेटमध्ये तुला जागा नाहीय. पाकिस्तानला परत जा.” हे ऐकून बाबरला राग येतो. तो मागे वळतो आणि चाहत्यांकडे पाहतो. चाहतेही इथेच थांबतात आणि त्याच्यावर हसायला लागतात.

हेही वाचा – Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ‘या’ देशाचा पाकिस्तानला पाठिंबा, BCCI शी पंगा घेणं पडू शकतं महागात

यानंतर एक चाहता पुन्हा पंजाबीत म्हणतो, “अरे, तुला राग पण येतो का. पुन्हा रागाने बघून दाखवं. तू फक्त कॅच सोडं आणि इतरांसाठी टाळ्या वाजवतं रहा.” आणखी एक चाहता पंजाबीमध्ये म्हणतो, “बाबर, मी हा व्हिडिओ अपलोड करत आहे. त्याची तक्रार कर.”

हेही वाचा – SL vs NZ : सनथ जयसूर्याच्या मार्गदर्शनात श्रीलंकेचा विजयरथ सुसाट! मायदेशात सलग सहाव्या मालिकेत फडकावली विजयी पताका

बाबर आझम सध्या अडचणीत आहे. खराब फॉर्ममुळे त्याला इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांत संघातून वगळण्यात आले होते. यानंतर बाबरच्या पाकिस्तानसोबतच्या भवितव्यावर प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, त्याला वनडे आणि टी-२० मालिकेत कायम ठेवण्यात आले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Have some shame and go back babar azam was brutally trolled by a group of spectators at sydney during aus vs pak 2nd t20i vbm