Hazrat Bilal no ball video viral : क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा नो बॉल आणि मॅच फिक्सिंगची चर्चा होते, तेव्हा क्रिकेटप्रेमींच्या मनात सर्वात प्रथण मोहम्मद आमिरचे नाव येते. पाकिस्तानच्या या खेळाडूने जाणूनबुजून इंग्लंडविरुद्ध असे कृत्य करून क्रिकेटला कलंकित केले होते, मात्र आता यूएईचा गोलंदाज त्याच्या एक पाऊल पुढे गेला आहे. यूएईमध्ये सुरु असलेल्या अबू धाबी टी-१० लीग दरम्यान यजमान देशाचा गोलंदाज हजरत बिलाल याने आमिरपेक्षा मोठा नो बॉल टाकून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हजरत बिलाल ही कृती पाहून ड्रेसिंग रुममध्ये बसलेले खेळाडू आणि तसेच मैदानावर उपस्थित असलेला फाफ डू प्लेसिसही आश्चर्यचकित झाला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अबू धाबी टी-१० लीगचा पाचवा सामना न्यूयॉर्क स्ट्रायकर्स आणि मॉरिसविले सॅम्प आर्मी यांच्यात खेळला गेला. या सामन्यादरम्यान हजरत बिलालने फक्त एक षटक टाकले आणि चर्चेत आला. या षटकात त्याने क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा नो बॉल टाकला. त्याचबरोबर या षटकात त्याने एकूण ९ धावा दिल्या. हजरत बिलालच्या या कृतीनंतर त्याच्यावर मॅच फिक्सिंगचे आरोप होऊ लागले. तसेच त्याने टाकलेल्या नो बॉलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा – Nitish Reddy : ‘जसं तुम्ही देशासाठी गोळी झेलत आहात…’, असं का म्हणाला गौतम गंभीर? पदार्पणवीर नितीश रेड्डीने केला खुलासा

या लीगमध्ये अभिमन्यू मिथुनने पण अशी केली होती कृती –

गेल्या वर्षी २०२३ मध्ये, भारतीय गोलंदाज अभिमन्यू मिथुनने चेन्नई ब्रेव्हज विरुद्ध नॉर्दर्न वॉरियर्स सामन्यादरम्यान प्रचंड मोठा नो बॉल टाकून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यावेळी त्याच्यावरही मॅच फिक्सिंगचा आरोपही झाला होता. अभिमन्यू मिथुनने भारतासाठी ४ कसोटी आणि ५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. या वेगवान गोलंदाजाला २०१० मध्ये माजी कर्णधार एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली पदार्पण करण्याची संधी मिळाली. या काळात त्याने सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांसारख्या दिग्गजांसह ड्रेसिंग रूम शेअर केली आहे. मिथुनने ४ कसोटीत ९ आणि ५ एकदिवसीय सामन्यात ३ विकेट्स घेतल्या आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hazrat bilal bowled the biggest no ball in the history of cricket during abu dhabi t10 league match video viral vbm