भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेटचा सामना म्हणलं, की दोन्ही संघामधल्या खेळाडूंचं द्वंद्व हा प्रकार ठरलेलाच असतो. काही महिन्यांपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बॉल टॅम्परिंग करताना पकडले गेले, यानंतर संपूर्ण जगभरातून कांगारुंचा संघ टीकेचा धनी बनला. यानंतर भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या खेळाडूंना मैदानात मर्यादा पाळण्याचं आवाहन केलं आहे. मात्र भारतीय कर्णधार विराट कोहलीचं मैदानातलं सेलिब्रेशन, ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक जस्टीन लँगर यांना रुचलं नाही. हाच प्रकार आम्ही केला असता तर मिरच्या झोंबल्या असत्या, असं म्हटत लँगर यांनी भारतीय कर्णधारावर टीका केली आहे. मात्र, भारताचा माजी खेळाडू व्ही. व्ही. एस. लक्ष्मण हा विराटच्या मदतीला धावून आला आहे. विराटची ती कृती ही त्याच्या सेलिब्रेशनची स्टाईल असल्यामुळे तो काहीही वावगं करत नसल्याचं लक्ष्मणने म्हटलं आहे, तो ESPNCricinfo संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा