भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकला टी-२० विश्वचषकानंतर संघात स्थान मिळालेले नाही. त्यानंतर तो आता आयपीएल २०२३ मध्ये आरसीबीकडून खेळताना दिसणार आहे. मात्र त्याआधी तो आपले जुने काम करताना दिसणार आहे. वास्तविक, कार्तिक ९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये कॉमेंट्री करताना दिसणार आहे. याबाबत दिनेश कार्तिकने एक ट्विट करुन माहिती दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत कॉमेंट्री करण्यासाठी डीके खूप उत्सुक दिसत आहे. यासंदर्भातील त्याने एक पोस्ट ट्विटरवर शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने याबाबत माहिती दिली आहे. कार्तिकने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “माझे कसोटी पदार्पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाले होते आणि आता ते पुन्हा होणार आहे.” विशेष म्हणजे, दिनेश कार्तिकने २००४ साली मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघाकडून कसोटी पदार्पण केले होते.

दिनेश कार्तिकने भारतासाठी २६ कसोटी सामने खेळले असून २५ च्या सरासरीने एकूण १०२५ धावा केल्या आहेत. कार्तिकने २०१८ साली लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. तो ९४ एकदिवसीय आणि ६० टी-२० सामने खेळला आहे, ज्यामध्ये त्याने १७५२ आणि ६८६ धावा केल्या आहेत, तसेच ९ वनडे आणि १ टी-२० मध्ये अर्धशतक आहे.

हेही वाचा – ENG vs SA 3rd ODI: तलवार फिरवल्याप्रमाणे मोईन अलीने एका हाताने लगावला शॉट; VIDEO होतोय व्हायरल

कार्तिक आयपीएल २०२२ मध्ये त्याच्या अप्रतिम कामगिरीमुळे टीम इंडियामध्ये स्थान मिळवू शकला. त्यानंतर गेल्या वर्षी २०२२ च्या टी-२० विश्वचषकानंतर त्याला पुन्हा संघात संधी मिळाली नाही. २०१९ च्या विश्वचषकात कॉमेंट्री करणारा कार्तिक पुन्हा एकदा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये कॉमेंट्री करताना दिसणार आहे. जेव्हा त्याने कॉमेंट्री सुरू केली तेव्हा त्याने केलेली कॉमेंट्री चाहत्यांना खूप आवडली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: He himself tweeted the information that dinesh karthik will be doing commentary in the border gavaskar trophy vbm