Rohit Sharma Fitness: विराट कोहली टीम इंडियात आल्यानंतर भारतीय क्रिकेटचा संपूर्ण नकाशाच बदलून गेला. अंकित कालियार म्हणाला की, “भारतीय संघात निवडीसाठी पूर्वीचा ‘तंदुरुस्ती’ हा आवश्यक निकष नव्हता, पण क्रिकेटचा विकास आणि या खेळात विराटच्या येण्यामुळे बरेच काही बदलले आहे. विराट कोहली हे निःसंशयपणे आज कोणत्याही तरुणांसाठी फिटनेसचे सर्वोत्तम उदाहरण आहे, परंतु इतर भारतीय खेळाडूही या बाबतीत मागे नाहीत.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाला भारतीय फिल्डिंग प्रशिक्षक?

अंकितने एका मुलाखतीत सांगितले की, “रोहित शर्मा एक फिट खेळाडू आहे. त्याचा फिटनेस चांगला आहे. तो थोडा जाड दिसत असेल, मात्र तो नेहमी यो-यो टेस्ट पास करतो. तो विराट कोहलीसारखा फिट आहे पण, तो जाड दिसतो इतकाच काय तो फरक आहे. आम्ही रोहितचे क्षेत्ररक्षण मैदानावर पाहिले असून त्याची चपळता आणि गतिशीलता अप्रतिम आहे. तो सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक आहे.”

प्रशिक्षकांनी कोहलीचे कौतुक केले

कोहलीबद्दल बोलताना कालियारने कबूल केले की, सुपरस्टार फलंदाज आल्यापासून संघाच्या फिटनेस संस्कृतीत बदल झाला आहे. तो म्हणाला, “जर फिटनेसचा विचार केला तर विराट हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. त्याने संघात फिटनेस जागरूकता आणली आहे. जेव्हा तुमचा अव्वल खेळाडू इतका तंदुरुस्त असतो, तेव्हा तुम्ही इतरांसाठी उदाहरण बनता. तो इतरांमध्ये आत्मविश्वास निर्माण करतो. कर्णधार असताना त्याने सर्वजण तंदुरुस्त राहतील याची काळजी घेतली. फिटनेस हा त्याचा संघातील सर्वोच्च मापदंड होता. ती संस्कृती आणि शिस्त त्याने संघात निर्माण केली. विराट भाईने निर्माण केलेले वातावरण वाखाणण्याजोगे आहे. यामुळेच सर्व भारतीय खेळाडू इतके तंदुरुस्त आहेत.”

हेही वाचा: IND vs SA: भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी दक्षिण आफ्रिकेच्या चिंतेत भर, ‘या’ दिग्गज खेळाडूने दिले निवृत्तीचे संकेत

भारतीय फिल्डिंग प्रशिक्षकाने असेही पुढे सांगितले केले की, शुबमन गिलला विराट कोहली केवळ फलंदाजीच्या दृष्टिकोनातूनच नव्हे तर तंदुरुस्तीच्या दृष्टिकोनातूनही प्रेरणा देतो. तो म्हणाला, “शुबमनही खूप फिट आहे. नुसता तंदुरुस्त नाही तर तो अतिशय कुशल खेळाडू आहे. शुबमन विराट भाईपासून प्रेरणा घेत आहे यात शंका नाही. फलंदाजी असो, तंदुरुस्ती असो किंवा कौशल्य असो, शुबमन विराटला फॉलो करतोय. आगामी काळात शुबमन देशासाठी चांगली कामगिरी करेल याची मला खात्री आहे.”

भारतीय क्रिकेटने यो-यो टेस्टला खूप महत्त्व दिले

भारतीय क्रिकेटमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून यो-यो टेस्ट हा चर्चेचा विषय आहे. कोरोना होईपर्यंत टीम इंडियात निवडीसाठी ही चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक होते. कोरोनाच्या काळात ही शिथिलता होती. यो-यो चाचणीमुळे भारतीय खेळाडूंच्या फिटनेसमध्ये बरीच सुधारणा झाली आहे. आयपीएलच्या १५व्या हंगामापूर्वी हार्दिक पंड्या आणि पृथ्वी शॉसह अनेक भारतीय खेळाडूंची यो-यो चाचणी घेण्यात आली होती. हार्दिक परीक्षेत उत्तीर्ण झाला, पण पृथ्वी नापास झाला.

हेही वाचा: गौतम गंभीरचे बाबर आझमच्या कॅप्टन्सीबाबत मोठे विधान; म्हणाला, “आता तो नव्या स्वरुपात…”

याआधीही यो-यो चाचणीमध्ये अनेक खेळाडू नापास झाले आहेत. यामध्ये युवराज सिंग, सुरेश रैना, अंबाती रायडू, मोहम्मद शमी, संजू सॅमसन आणि वरुण चक्रवर्ती या खेळाडूंचा समावेश आहे. आता आयपीएल खेळण्यासाठीही यो-यो चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. म्हणजेच बीसीसीआयच्या केंद्रीय कराराखाली असलेल्या खेळाडूंना यो-यो चाचणी उत्तीर्ण करावी लागेल. जर असे झाले नाही तर तो आयपीएल खेळू शकणार नाही. पृथ्वी केंद्रीय कराराखाली नसल्यामुळे तो आयपीएल २०२२ मध्ये खेळला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: He is a bit heavy but like virat is fully fit fitness coach revealed about rohit sharma avw
Show comments