Harbhajan Singh said Rohit Sharma is a better captain than MS Dhoni : महेंद्रसिंग धोनी हा भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याने आपल्या नेतृत्त्वाखाली भारताला एक-दोन नव्हे तर तीन आयसीसी ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत. इतर कोणत्याही भारतीयाच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला दोनही आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात यश आलेले नाही. असे असतानाही हरभजन सिंगला धोनीपेक्षा रोहितची नेतृत्त्व शैली आवडते. याबाबतचे कारण स्वत: हरभजन सिंगने सांगितले. तो म्हणाला, रोहित शर्मा हा खेळाडूंचा कर्णधार आहे.

रोहित हा खेळाडूंचा कर्णधार –

‘स्पोर्ट्स यारी’वर बोलताना हरभजन सिंगने सांगितले की त्याने महेंद्रसिंग धोनीऐवजी रोहित शर्माची नेतृत्त्व करण्याची शैली आवडते. तो म्हणाला, मी धोनीपेक्षा रोहितच्या नावाला पसंती दिली. कारण रोहित हा खेळाडूंचा कर्णधार आहे. तो स्वत: खेळाडूंकडे जातो आणि त्यांना काय पाहिजे ते विचारतो. ज्यामुळे त्याचे सहकारी त्याच्याशी चांगल्या प्रकारे जोडले जातात. पण धोनीची शैली वेगळी होती.

Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Sunil Gavaskar Statement on India Defeat
IND vs AUS: “हॉटेलच्या रूममध्ये बसून…”, सुनील गावस्कर पराभवानंतर भारतीय संघावर संतापले, रागाच्या भरात नेमकं काय म्हणाले?
Rohit Sharma on Mohammed Shami Fitness and Comeback in Team for last 3 Test Against Australia
IND vs AUS: मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबद्दल रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, दुसऱ्या कसोटी पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?
Sharad Pawar News
Chandrashekhar Bawankule : “शरद पवारांनी या वयात खोटारडेपणा करु नये, पराभव स्वीकारावा आणि..”, भाजपाच्या ‘या’ नेत्याची टीका
Supriya Sule At Press Conference.
Supriya Sule : दादांचा भाऊ म्हणून अभिमान वाटतो का? अजित पवारांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या….
IND vs AUS Controversial Umpiring Over R Ashwin LBW Appeal as Mitchell Marsh Given Out KL Rahul DRS b
IND vs AUS: राहुल आऊट अन् मार्श नॉट आऊट, तिसऱ्या पंचांचा पुन्हा एकदा भारताविरूद्ध निर्णय; मैदानात नेमकं काय घडलं?
Nitish Reddy on Turning Point of Career Said After I Saw my Father Cry Over Financial Struggle Watch Video
Nitish Reddy: “मी वडिलांना रडताना पाहिलं अन्…”, नितीश रेड्डीने सांगितला जीवनातील टर्निंग पॉईंट; विराटबाबत पाहा काय म्हणाला?

धोनी आणि रोहित हे पूर्णपणे वेगळे कर्णधार –

हरभजन सिंग पुढे म्हणाला, “तो (धोनी) कोणाशीही बोलत नव्हता. मौनातून तो आपले विचार मांडत असत. ही त्याची इतरांशी बोलण्याची पद्धत होती. धोनी आणि रोहित हे पूर्णपणे वेगळे कर्णधार आहेत. एमएस धोनी कधीही कोणत्याही खेळाडूकडे जात नाही आणि त्याला कसे क्षेत्ररक्षण हवे आहे, हे विचारत नाही. तो तुम्हाला तुमच्या चुकांमधून शिकू देईल.”

हेही वाचा – IND vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या T20I मालिकेपूर्वी गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्केल हार्दिकवर नाराज? जाणून घ्या कारण

‘धोनीने जे केले ते रोहितनेही केले’ –

महेंद्रसिंग धोनीला क्रिकेट जगतातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक मानले जाते. त्याच वेळी, रोहितला अनेकदा खेळाडूंचा कर्णधार म्हणून पाहिले जाते, कारण तो खेळाडूंना स्वातंत्र्य आणि पाठिंबा देतो. विशेषतः तो गोलंदाजासाठी खास कर्णधार आहे. हरभजन म्हणाला, ‘एक चांगला कर्णधार तो असतो, जो तुम्हाला विजयासाठी लढायला भाग पाडतो. माझ्यासाठी धोनीने कर्णधार म्हणून जे काही केले, तेच रोहितनेही केले आहे. त्यामुळे तो कोणापेक्षा कमी नाही.

हेही वाचा – Womens T20 WC 2024 : श्रीलंका-पाक सामन्यात रुमाल पडल्याने फलंदाजाला मिळाले जीवदान, नेमकं कारण काय? जाणून घ्या

हरभजन या दोघांच्या नेतृत्वाखाली खेळलाय –

हरभजन सिंग रोहित शर्मा आणि एमएस धोनी या दोघांच्या नेतृत्वाखाली खेळला आहे. तो रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळला. याच लीगमध्ये भज्जी एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला होता. रोहित आणि धोनी दोघेही आयपीएलचे सर्वात यशस्वी कर्णधार आहेत. रोहितने मुंबईसाठी आणि धोनीने चेन्नईसाठी ५ वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.

Story img Loader