Shubman Gill should focus on his batting not hairstyle : ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज ॲडम गिलख्रिस्टने भारतीय संघाच्या युवा फलंदाजाला महत्त्वाचा सल्ला दिला आहे. त्याच्या मते युवा खेळाडूने आपले लक्ष दुसरीकडे वळवण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. भारताचे भविष्य मानल्या जाणाऱ्या शुबमन गिलने केसांवर नव्हे तर फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे गिलख्रिस्टने म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शुबमन गिलसाठी नुकताच संपलेला ऑस्ट्रेलिया दौरा चांगला नव्हता. गिलने तीन सामन्यांत केवळ ९३ धावा केल्या होत्या. या काळात त्याच्या बॅटमधून एकही अर्धशतक आले नाही. तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यातही गिलला वगळण्यात आले. गिलख्रिस्ट म्हणाला की, गिलने केसांपेक्षा फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे.

ॲडम गिलख्रिस्टचा शुबमन गिलला सल्ला –

ॲडम गिलख्रिस्टने एक पॉडकास्टमध्ये गिलला रेटींग देताना म्हणाला, “मला त्याला १० पैकी तीन गुण द्यायचे होते, पण मी त्याला चार गुण देईन. मला वाटते की हेल्मेट काढल्यानंतर कोणताही क्रिकेटपटू चांगला दिसत नाही. त्याला त्याच्या केसांपेक्षा त्याच्या फलंदाजीवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे.” गिलला भारताचे भविष्य मानले जाते. भारताच्या शेवटच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तो संघासोबत होता आणि त्याने शानदार फलंदाजी केली होती.”

हेही वाचा – Jasprit Bumrah : ‘….बुमराह असता तर ब्रॅडमनची सरासरी ९९ नसती’, आस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचं मोठं विधान

मायकल वॉन शुबमनबद्दल काय म्हणाला?

शुबमन गिलवर केवळ गिलख्रिस्टच नाही तर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनही नाराज आहे. वॉननेही गिलला १० पैकी चार गुण दिले आहेत. वॉन म्हणाला, “मी त्याला १० पैकी चार देतो. गिलने मला नाराज केले. त्याला मोठी धावसंख्या उभारावी लागेल आहे. तो एक चांगला फलंदाज आहे आणि त्याची फलंदाजी खूप सुंदर आहे.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: He should focus on his batting and not hairstyle adam gilchrist slams shubman gill his failures vbm