भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री व इतर प्रशिक्षक वर्गाला मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अनिल कुंबळे यांच्या राजीनाम्यानंतर, बीसीसीआयने रवी शास्त्री यांची संघाच्या प्रशिक्षकपदी नेमणूक केली. सहायक प्रशिक्षक संजय बांगर, गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर या सहकाऱ्यांनाही बीसीसीसीआयने २०१९ विश्वचषकापर्यंत करारबद्ध केलं होतं. मात्र २०२० साली ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी रवी शास्त्री व त्यांच्या सहकाऱ्यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.

अवश्य वाचा – धोनी दिग्गज खेळाडू, त्याची आणि माझी तुलना करु नका – ऋषभ पंत

मुंबईत आज झालेल्या बैठकीत हा मुद्दा चर्चेसाठी येणार होता. क्रिकेट प्रशासकीय समिती आणि बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांच्यात आज मुंबई येथे बैठक पार पडली. मिळालेल्या माहितीनुसार, क्रिकेट प्रशासकीय समिती भारतीय संघाच्या प्रशिक्षक वर्गाला २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यासाठी सकारात्मक आहे.

अवश्य वाचा – धोनी दिग्गज खेळाडू, त्याची आणि माझी तुलना करु नका – ऋषभ पंत

रवी शास्त्री व अन्य प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने गेल्या काही सामन्यांमधे चांगली कामगिरी केली आहे. या कामगिरीवर प्रशासकीय समिती खुश असल्याचं कळतंय. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कसोटी मालिका विजय, न्यूझीलंडमध्ये वन-डे मालिका विजय आणि घरच्या मैदानावर केलेली आश्वासक कामगिरी या सर्व बाबी रवी शास्त्री व त्यांच्या सहकाऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे या प्रकरणात क्रिकेट प्रशासकीय समिती नेमका काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – चौथ्या क्रमांकाची इतकी चर्चा कशाला, अंबाती रायुडू योग्य उमेदवार – मॅथ्यू हेडन

Story img Loader