ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेन शहरात सुरु असलेल्या राष्ट्रकुल नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या हिना सिद्धुने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. हिनाने ६२६.२ गुणांची कमाई करत पहिलं स्थान पटकावलं. काही दिवसांपूर्वीच नवी दिल्लीत पार पडलेल्या ISSF World Cup Final स्पर्धेत हिनाने आपला सहकारी जितू रायसोबत १० मी एअर पिस्तुल सांघिक प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिनाव्यतिरीक्त भारताच्या दिपक कुमारने १० मी एअर रायफल प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली. लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाची कमाई करणारा गगन नारंग या प्रकारात चौथ्या क्रमांकावर राहिला. तर भारताच्याच रवीकुमारने या प्रकारात पाचवं स्थान पटकावलं. मात्र गगन नारंगने ६२६.२ गुणांची कमाई करत राष्ट्रकुल स्पर्धेत सर्वोत्तम गुणांचा विक्रम केला.