हिना सिद्धू हिने एअर पिस्तूलमध्ये, तर चैनीसिंग याने एअर रायफलमध्ये सोनेरी कामगिरी करीत आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताला आणखी उल्लेखनीय यश मिळवून दिले. ही स्पर्धा कुवेतमध्ये सुरू आहे. हिना हिने पात्रता फेरीत ४०० पैकी ३८६ गुण मिळवित अग्रक्रमांकाने अंतिम फेरीत स्थान मिळविले होते.
अंतिम फेरीतही तिने अव्वल स्थानाला साजेशी कामगिरी करताना २००.३ गुणांची नोंद केली व सुवर्णपदक जिंकले. हिना हिने श्वेता चौधरी (३७५) व हरवीन (३७४) यांच्यासमवेत सांघिक विभागात रौप्यपदक पटकाविले. चीनला सुवर्णपदक मिळाले तर चीन तेपेईला कांस्यपदक मिळाले. श्वेता चौधरी हिनेदेखील अंतिम फेरीत स्थान मिळविले होते मात्र तिला १३१.८ गुणांचीच नोंद करता आली.
पुरुषांच्या एअर रायफल विभागात चैनसिंगने पात्रता फेरीत ६१९.६ गुणांसह अव्वल स्थान घेतले. त्यानंतर त्याने अंतिम फेरीत २०६ गुणांची कमाई करीत सोनेरी यश मिळविले. चैनसिंग याने सांघिक विभागात रवीकुमार (६२०.७) व पी.रघुनाथ (६१५.८) यांच्या समवेत कांस्यपदक मिळविले.चीन व इराणने अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक मिळविले. भारताने आतापर्यंत या स्पर्धेत तीन सुवर्ण, दोन रौप्य व दोन कांस्यपदकांची कमाई केली आहे.
आशियाई नेमबाजी स्पर्धा : हिना सिद्धू व चैनसिंगचा सुवर्णवेध
हिना सिद्धू हिने एअर पिस्तूलमध्ये, तर चैनीसिंग याने एअर रायफलमध्ये सोनेरी कामगिरी करीत आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताला आणखी उल्लेखनीय यश मिळवून दिले. ही स्पर्धा कुवेतमध्ये सुरू आहे.
First published on: 11-03-2014 at 01:32 IST
TOPICSहिना सिधू
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heena sidhu chain singh win gold in asian championship