SA20 2025 Heinrich Klaasen six video : टी-२० क्रिकेटमध्ये सरास फलंदाजांचे वर्चस्व पाहिला मिळते, त्यामुळे बऱ्याचदा गोलंदाजांची चांगलीच धुलाई होताना दिसते. अनेकवेळा फलंदाज इतका उत्तुंग षटकार मारतात की चेंडू स्टेडियमच्या बाहेर जातो अन् गोलंदाजांची लाईन लेन्थ बिघडते. असाच काहीसा प्रकार दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जाणाऱ्या एसएटीट्वेन्टी लीगमध्ये पाहायला मिळाला. या स्पर्धेतील आठव्या सामन्यात हेनरिक क्लासेनने मारलेल्या षटकाराचा चेंडू स्टेडियमबाहेर गेला, ज्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ही घटना डर्बन सुपर जायंट्स आणि जॉबर्ग सुपर किंग्ज यांच्यात खेळल्या गेलेल्या आठव्या सामन्यात घडली. या सामन्यात जोबर्ग सुपर किंग्जच्या १६९ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या डर्बन संघाची सुरुवात काही खास झाली नाही. संघाने २५ धावांवर सलामीच्या जोडीची विकेट गमावली. यानंतर काही वेळात डर्बनने ५१ धावांपर्यंत ४ विकेट गमावल्या होत्या आणि त्यानंतर क्विंटनला साथ देण्यासाठी दिग्गज फलंदाज हेनरिक क्लासेन फलंदाजीला आला. यावेळी १० व्या षटकात हेनरिक क्लासेनने इतका लांब षटकार मारला की सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

हेनरिक क्लासेनच्या षटकाराचा व्हिडीओ व्हायरल –

हेनरिक क्लासेनने तबरेझ शम्सीच्या या षटकातील पाचव्या चेंडूवर हा षटकार मारला. या षटकाराचा चेंडू थेट स्टेडियमच्या बाहेर गेला. क्लासेनच्या या शॉटमध्ये इतकी ताकद होती की चेंडू स्टेडियमच्या छतावर आदळल्यानंतर रस्त्यावर जाऊन पडला. यादरम्यान, तेथून जाणाऱ्या एका चाहत्याने चेंडू उचलला आणि घेऊन गेला. आता या षटकाराचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असून सर्वजण त्याचे कौतुक करत आहेत.

हेही वाचा – Virat Kohli : ‘विराट कोहलीचा काळ गेला…’, इंग्लंडच्या माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘वयाबरोबर प्रत्येकजण…’

जोबर्ग सुपर किंग्जने मारली बाजी –

सामन्याबद्दल बोलायचे तर, किंग्समीड, डर्बन येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात जोबर्ग सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना जोबर्ग सुपर किंग्जने २० षटकांत ७ गडी गमावून १६९ धावा केल्या. संघाकडून लुईस डू प्लॉयने सर्वाधिक ३८ धावा केल्या. डर्बन सुपर जायंट्ससाठी सुब्रेन, ख्रिस वोक्स आणि कर्णधार केशव महाराज यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात डर्बन सुपर जायंट्सचा संघ १८ षटकांत १४१ धावांत गारद झाला, ज्यामुळे त्यांना २८ धावांनी सामना गमवावा लागला. या संघासाठी क्विंटन डि कॉकने सर्वाधिक ५८ धावांचे योगदान दिले, तर हेनरिक क्लासेनने २९ धावा केल्या. जोबर्ग संघासाठी तबरेझ शम्सी, जेराल्ड कोएत्झी आणि डोनोव्हन फरेरा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heinrich klaasen hit maximum six ball gone out of stadium video viral in sat20 2025 vbm