Henry Nicholls accused of ball tampering in the Plunkett Shield: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सलग चार पराभव पत्करून न्यूझीलंड संघ विजयी मार्गावर परतला आहे. गुरुवारी (९ नोव्हेंबर) श्रीलंकेविरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवून उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. पहिल्या उपांत्य फेरीत त्याचा सामना भारताशी होऊ शकतो. दरम्यान, किवी संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. त्याचा अनुभवी फलंदाज हेन्री निकोल्सवर चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, त्याचा विश्वचषक स्पर्धेत समावेश नाही.

एकदिवसीय विश्वचषकानंतर न्यूझीलंडला बांगलादेशचा दौरा करायचा आहे. त्या संघात हेन्री निकोल्सचा समावेश आहे. न्यूझीलंडमधील प्लंकेट शील्ड या देशांतर्गत स्पर्धेदरम्यान त्याच्यावर चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप आहे. आरोप खरे ठरले तर त्याच्या अडचणी वाढू शकतात.

Ball tampering by India A players during the match against Australia A test match sports
भारत ‘अ’ संघावर चेंडूशी छेडछाड केल्याचे आरोप!
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
IND vs NZ Anil Kumble Lashes Out At Rohit Sharma and Gautam Gambhir
IND vs NZ : ‘तुम्ही फलंदाजांना दोष देऊ नका…’, मालिका गमावल्यानंतर अनिल कुंबळे रोहित-गौतमवर संतापले
IND vs NZ Harbhajan Singh Statement
IND vs NZ : ‘भारतासाठी ‘ती’ गोष्ट शत्रू ठरतेय…’, मायदेशात पहिल्यांदाच कसोटीत व्हाइट वॉश झाल्यानंतर हरभजन सिंगचे मोठे वक्तव्य
IND vs NZ Tom Latham Statement After India clean sweep
IND vs NZ : ‘आम्ही भारतीय संघाच्या खेळण्याच्या पद्धतीबद्दल…’, ऐतिहासिक मालिका विजयानंतर टॉम लॅथमने सांगितले किवीच्या यशाचे गुपित
New Zealand cricket team
Ind vs New: न्यूझीलंडने भारतात येऊन ‘करून दाखवलं’, ७ अचंबित करणारे विक्रम केले नावावर, जाणून घ्या
IND vs NZ India suffered their first-ever home series whitewash in a three-match Test series, losing the third Test at the Wankhede Stadium in Mumbai by 25 runs on Sunday
IND vs NZ : टीम इंडियाचा सलग तिसऱ्या सामन्यात लाजिरवाणा पराभव! न्यूझीलंडने व्हाइट वॉश करत भारतात घडवला इतिहास
IND A vs AUS A Ishan Kishan in Trouble as India A team accused of ball tampering
IND A vs AUS A : धक्कादायक! ऑस्ट्रेलियात टीम इंडियावर ‘बॉल टॅम्परिंग’चा आरोप, पंचांशी वाद घातल्याने इशान किशन अडचणीत

काय आहे संपूर्ण प्रकरण?

प्लंकेट शील्ड स्पर्धेत (प्रथम श्रेणी स्पर्धा) कँटरबरी आणि ऑकलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. निकोल्सवर हेल्मेटच्या मदतीने चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप आहे. व्हिडीओमध्ये तो हेल्मेटने चेंडू घासत असल्याचे दिसत आहे. त्याच्यावरील आरोप सिद्ध झाल्यास त्याच्यावर सहा कसोटी किंवा १२ एकदिवसीय सामन्यांची बंदी घातली जाऊ शकते.

हेही वाचा – SA vs AFG: अफगाणिस्तानने दक्षिण आफ्रिकेसमोर ठेवले २४५ धावांचे लक्ष्य, अजमतुल्ला उमरझाईने खेळली नाबाद ९७ धावांची खेळी

काय म्हणाले न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड?

न्यूझीलंड क्रिकेटलाही हेन्री निकोल्सच्या प्रकरणाबाबत निवेदन जारी करावे लागले आहे. आचारसंहितेच्या नियम ३.१ च्या कलम १.१५ चे उल्लंघन केल्याप्रकरणी हेन्री निकोल्सच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याचे बोर्डाने म्हटले आहे. कँटरबरी आणि ऑकलंड यांच्यात हॅगले ओव्हल येथे झालेल्या प्लंकेट शील्ड सामन्याच्या तिसऱ्या दिवशी त्याने ही चूक केली.

हेन्री निकोल्सची कारकीर्द –

हेन्री निकोल्सने न्यूझीलंडकडून ५४ कसोटी, ७२ एकदिवसीय आणि १० टी-२० सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने ३८.७८ च्या सरासरीने २९४८ धावा केल्या आहेत. त्याच वेळी, एकदिवसीय सामन्यात त्याने ३५.६३ च्या सरासरीने आणि ८०.८९ च्या स्ट्राइक रेटने १९६० धावा केल्या आहेत. टी-२० मध्ये निकोल्सने १२.५० च्या सरासरीने आणि ८९.२८ च्या स्ट्राईक रेटने १०० धावा केल्या आहेत. निकोल्सने ११५ प्रथम श्रेणी सामनेही खेळले आहेत. या कालावधीत ४०.२२ च्या सरासरीने ६९५९ धावा केल्या आहेत.