श्रीलंकेचा डावखुरा फिरकी गोलंदाज रंगना हेराथ याला बांगलादेशविरुद्ध २३ मार्चपासून सुरू होणाऱ्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे. १६ जणांच्या श्रीलंका संघात किथरूवान विथानेज, सचिथ पाथिराना आणि अँजेलो परेरा या तीन नवोदित खेळाडूंना स्थान मिळाले आहे. महेला जयवर्धनेचा तंदुरुस्तीच्या कारणास्तव या मालिकेसाठी विचार करण्यात आलेला नाही.
श्रीलंका संघ : अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), दिनेश चंडीमल, तिलकरत्ने दिलशान, कुशल परेरा, कुमार संगकारा, लाहिरू थिरिमाने, जीवन मेंडिस, थिसारा परेरा, नुवान कुलसेकरा, लसिथ मलिंगा, सचित्र सेनानायके, उपुल तरंगा, शामिंदा एरंगा, किथरूवान विथानेज, सचिथ पाथिराना आणि अँजेलो परेरा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा