अ‍ॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटीचा दुसरा दिवसही गोलंदाजांनीच गाजवला. दुसऱ्या दिवशीच्या खेळात तब्बल १६ विकेट्स पडल्या मात्र गोलंदाजीसह अन्य आघाडय़ांवर चांगला खेळ करत इंग्लंडने कसोटीवर पकड घट्ट मिळवली आहे. ७ बाद २८९ वरुन पुढे खेळणाऱ्या इंग्लंडने ७२ धावांची महत्त्वपूर्ण भर घातली. इंग्लंडचा डाव ३६१ धावांवर संपुष्टात आला. यानंतर ग्रॅमी स्वॉनच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या १२८ धावांतच गुंडाळला. इंग्लंडला २३३ भक्कम आघाडी मिळाली मात्र इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकने ऑस्ट्रेलियाने फॉलोऑन न देण्याचा निर्णय घेतला. मात्र दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडची ३ बाद ३१ अशी अवस्था झाली आहे. इंग्लंडकडे २६४ धावांची आघाडी आहे.
स्टुअर्ट ब्रॉड आणि ग्रॅमी स्वॉन जोडीने शेवटच्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी केल्याने इंग्लंडने साडेतीनशेचा टप्पा ओलांडला. रायन हॅरिसने सर्वाधिक ५ बळी टिपले.ऑस्ट्रेलियातर्फे वॉटसन-रॉजर्स जोडीने ४२ धावांची सलामी दिली मात्र यानंतर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची घसरगुंडी उडाली. ठराविक अंतरात विकेट्स पडत गेल्याने ऑस्ट्रेलियाचा डाव १२८ धावांतच आटोपला. शेन वॉटसनने सर्वाधिक ३० धावा केल्या. फिरकीपटू ग्रॅमी स्वॉनने ४४ धावांत ५ बळी टिपले.
भक्कम आघाडीसह खेळणाऱ्या इंग्लंडची दुसऱ्या डावात खराब सुरुवात झाली. अ‍ॅलिस्टर कुक (८) तर जोनाथन ट्रॉट शून्यावरच बाद झाले. केव्हिन पीटरसन ५ धावा करुन तंबूत परतला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम ब्रेसनन ० तर जो रुट १८ धावांवर खेळत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संक्षिप्त धावफलक
इंग्लंड (पहिला डाव) : सर्वबाद ३६१ (इयान बेल १०९, रायन हॅरिस ५/७२)
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : सर्वबाद १२८ (शेन वॉटसन ३०, ग्रॅमी स्वॉन ५/२८)
इंग्लंड (दुसरा डाव) : ३ बाद ३१ (जो रुट खेळत आहे १८, पीटर सिडल ३/४)  विरुद्ध .

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: High 5 for swann low blow for australia