R Ashwin’s controversial statement on Hindi Language : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विन कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. कधी त्याच्या विचित्र सोशल मीडिया पोस्टबद्दल तर कधी त्याच्या वक्तव्याबद्दल. निवृत्तीनंतर अश्विनकडे भरपूर वेळ असतो, त्यामुळे तो अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही सहभागी होत असतो. नुकतेच एका खासगी कॉलेजच्या पदवीदान समारंभात सहभागी झालेल्या आर अश्विनने हिंदी भाषेबाबत असं काही वक्तव्य केलं की तो पुन्हा चर्चेत आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाविद्यालयाच्या पदवीदान समारंभात विद्यार्थ्यांना संबोधित करताना अश्विनने विद्यार्थ्यांना कोणत्या भाषेत भाषण ऐकायचे आहे, इंग्रजी… तमिळ की हिंदी, असे विचारले. यावेळी त्याने विद्यार्थ्यांना हिंदीबद्दल विचारले असता सर्वजण नि:शब्द झाले, तेव्हा अश्विन म्हणाला हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही. त्याच्या या वक्तव्यामुळे तो सध्या चर्चेत आहे.

अश्विन हिंदी भाषेबद्दल काय म्हणाला?

आपल्या भाषणाच्या सुरुवातीला अश्विनने प्रथम इंग्रजीमध्ये कोणाला ऐकायला आवडेल असे विचारले, ज्याला विद्यार्थ्यांकडून सौम्य प्रतिसाद मिळाला, परंतु जेव्हा त्याने तमिळबद्दल विचारले तेव्हा विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. यानंतर तिसऱ्या म्हणजे अश्विनने हिंदीबद्दल प्रश्न विचारला, तेव्हा पूर्ण शांतता पसरली आणि काही वेळाने एक-दोन आवाज आले. तेव्हा अश्विन म्हणाला, “मला वाटतं की मी हे सांगावे हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही. ती अधिकृत भाषा आहे.”

हेही वाचा – BPL 2025 : फिल्डरने सोडला कॅच… तरीही केलं अपील, अंपायरने फलंदाजाला दिलं आऊट, VIDEO होतोय व्हायरल

अश्विनचे हिंदी भाषेबद्दल वादग्रस्त वक्तव्य –

हेही वाचा – BPL 2025 : फिल्डरने सोडला कॅच… तरीही केलं अपील, अंपायरने फलंदाजाला दिलं आऊट, VIDEO होतोय व्हायरल

अश्विनच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर खळबळ –

हिंदी आणि तमिळ भाषांवर नेहमीच चर्चा केली जाते आणि तामिळनाडूमध्ये हा एक संवेदनशील मुद्दा आहे. रविचंद्रन अश्विनच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडिया समिश्र प्रतिक्रिया येत आहेत. ज्यामध्ये काही त्याच्या वक्तव्याचे समर्थन करत आहेत, तर काही टीका करत आहेत.

अश्विन हा भारताचा दुसरा सर्वात यशस्वी कसोटी गोलंदाज –

कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये अश्विन सातव्या क्रमांकावर आहे. अश्विनच्या नावावर १०६ कसोटीत ५३७ विकेट्स आहेत. ५९ धावांत सात विकेट्स ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी आहे. या काळात त्याची सरासरी २४.०० होती आणि स्ट्राइक रेट ५०.७३ होता. कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीयांमध्ये अश्विन हा अनिल कुंबळेनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. कुंबळेच्या नावावर ६१९ कसोटी विकेट्स आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hindi is not indias national language r ashwins controversial statement video viral vbm