चपळता आणि पदलालित्य यांच्या शानदार मिश्रणाच्या बळावर चेंडूला गोलजाळ्याची दिशा देणारा हॉकीपटू सरदारा सिंग विवाहाच्या बेडीत अडकणार आहे. भारतीय हॉकी संघाचा कर्णधार सरदारा सिंग मैत्रीण अशपाल कौर भोगल हिच्याशी विवाहबद्घ होणार आहे. अशपालने ट्विटरच्या माध्यमातून या गोड नात्यासंदर्भात माहिती दिली. इंग्लंडमध्ये जन्मलेली अशपाल इंग्लंडचे प्रतिनिधित्व करणारी पहिली ब्रिटिश आशियाई खेळाडू आहे. २०१० मध्ये अशपाल इंग्लंडच्या कनिष्ठ हॉकी संघाचा भाग होती. महिलांच्या प्रीमियर लीग हॉकी स्पर्धेत अशपाल बिस्टन क्लबचे प्रतिनिधित्व करते. २०१२ लंडन ऑलिम्पिकदरम्यान सरदारा आणि अशपाल यांची भेट झाली. डिसेंबरमध्ये होणाऱ्या जागतिक हॉकी लीगच्या अंतिम टप्प्याच्या तयारीसाठी भारतीय पुरुष हॉकी संघ सध्या युरोपच्या दौऱ्यावर आहे. २०१६ रिओ ऑलिम्पिक हॉकी संघासाठी मानबिंदू आहे. या महत्त्वपूर्ण स्पर्धेपूर्वी सरदारा-अशपाल विवाहबद्ध होणार का याविषयी दोघांनीही भाष्य केलेले नाही.
हॉकीपटू सरदारा सिंग लवकरच लग्नाच्या बेडीत
चपळता आणि पदलालित्य यांच्या शानदार मिश्रणाच्या बळावर चेंडूला गोलजाळ्याची दिशा देणारा हॉकीपटू सरदारा सिंग विवाहाच्या बेडीत अडकणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 08-08-2015 at 01:00 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hockey captain sardar singh set to marry