नवी दिल्ली : भारतीय पुरुष हॉकी संघाचे प्रशिक्षक क्रेग फुल्टन यांनी आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी १६ खेळाडूंऐवजी ऑलिम्पिक स्पर्धेसाठीच्या सर्व २७ संभाव्य खेळाडूंनाच घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय हॉकी संघ ऑलिम्पिकपूर्वी होणाऱ्या या दौऱ्यात पाच कसोटी सामने खेळणार आहे.

संभाव्य खेळाडूंचे सध्या भुवनेश्वर येथे प्रशिक्षण शिबीर सुरू आहे. अंतिम संघ जाहीर करण्याची वेळ आली, तेव्हा फुल्टन यांनी आगामी ऑलिम्पिकसाठी तगडा संघ निवडण्याकरता सर्वच संभाव्य खेळाडूंना ऑस्ट्रेलियात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघ १ एप्रिलला ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणार असून अनुक्रमे ६, ७, १०, १२, १३ एप्रिल रोजी पाच कसोटी सामने खेळणार आहे. पाचही सामनेे पर्थ येथे होतील.

IPL Auction Who is Vaibhav Suryavanshi 13 Year Old Batter Becomes Youngest Player in IPL 2025 Mega Auction 2025 List
IPL 2025 Auction: कोण आहे वैभव सूर्यवंशी? आयपीएल लिलावात उतरणार फक्त १३ वर्षांचा भारतीय खेळाडू, ऑस्ट्रेलियाविरूद्ध झळकावलंय जलद शतक
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Shubman Gill ruled out of first Test match in Perth because of fractured thumb IND vs AUS Border Gavaskar Trophy
IND vs AUS: शुबमन गिल ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या कसोटीतून बाहेर, टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या, ‘हा’ खेळाडू करणार पदार्पण?
MATES scheme for indian
भारतीय विद्यार्थ्यांना नोकरी देणार ऑस्ट्रेलिया; काय आहे ‘MATES’ योजना? याचा लाभ कसा घेता येणार?
india vs south africa 3rd t20I match india eye batting revival against sa at centurion
भारतीय फलंदाजांकडे लक्ष; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा ट्वेन्टी२० सामना आज; सूर्यकुमार, पंड्याकडून अपेक्षा
Team India Performance in Border Gavaskar Trophy played at Australia
Team India : टीम इंडियाची ऑस्ट्रेलियामध्ये कामगिरी खूपच निराशाजनक, तब्बल ‘इतक्या’ वेळा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत पत्करावा लागलाय पराभव
Gautam Gambhir Press conference Team is prepared with Abhimanyu Easwaran and KL Rahul as potential replacements for the opening slot
Gautam Gambhir : रोहित शर्मा नाही तर कोण…? बुमराह नेतृत्व करणार अन् ‘हा’ खेळाडू देणार सलामी, गौतम गंभीरने केलं स्पष्ट

हेही वाचा >>>रोहितचे मार्गदर्शन अजूनही महत्त्वाचे! चाहत्यांचा आदर, पण टीकेकडे लक्ष नाही; कर्णधार हार्दिकचे वक्तव्य

ऑलिम्पिकपूर्वी भारतीय संघ प्रो लीग हॉकीच्या बेल्जियम येथील टप्प्यात खेळणार असल्यामुळे फुल्टन यांना येथे खेळाडूंना तपासून पाहण्याचा आणखी एक पर्याय उपलब्ध आहे.

भारतीय संघ

● गोलरक्षक : कृष्ण बहादूर पाठक, पी. आर. श्रीजेश, सूरज करकेरा.

● बचावपटू : हरमनप्रीत सिंग, जर्मनप्रीत सिंग, अमित रोहिदास, जुगराज सिंग, संजय, सुमित, अमीर अली.

● मध्यरक्षक : मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, विवेक सागर प्रसाद, समशेर सिंग, नीलकांत शर्मा, राजकुमार पाल, विष्णूकांत सिंग.

● आक्रमक : आकाशदीप सिंग, मनदीप सिंग, ललित कुमार उपाध्याय, अभिषेक, दिलप्रीत सिंग, सुखजीत सिंग, गुरजंत सिंग, मोहम्मद राहिल मौसीन, बॉबी सिंग धामी, अराइजीत सिंग हुंदल.