नवी दिल्ली : भारतीय पुरुष हॉकी संघाचे प्रशिक्षक क्रेग फुल्टन यांनी आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी १६ खेळाडूंऐवजी ऑलिम्पिक स्पर्धेसाठीच्या सर्व २७ संभाव्य खेळाडूंनाच घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय हॉकी संघ ऑलिम्पिकपूर्वी होणाऱ्या या दौऱ्यात पाच कसोटी सामने खेळणार आहे.
संभाव्य खेळाडूंचे सध्या भुवनेश्वर येथे प्रशिक्षण शिबीर सुरू आहे. अंतिम संघ जाहीर करण्याची वेळ आली, तेव्हा फुल्टन यांनी आगामी ऑलिम्पिकसाठी तगडा संघ निवडण्याकरता सर्वच संभाव्य खेळाडूंना ऑस्ट्रेलियात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघ १ एप्रिलला ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणार असून अनुक्रमे ६, ७, १०, १२, १३ एप्रिल रोजी पाच कसोटी सामने खेळणार आहे. पाचही सामनेे पर्थ येथे होतील.
हेही वाचा >>>रोहितचे मार्गदर्शन अजूनही महत्त्वाचे! चाहत्यांचा आदर, पण टीकेकडे लक्ष नाही; कर्णधार हार्दिकचे वक्तव्य
ऑलिम्पिकपूर्वी भारतीय संघ प्रो लीग हॉकीच्या बेल्जियम येथील टप्प्यात खेळणार असल्यामुळे फुल्टन यांना येथे खेळाडूंना तपासून पाहण्याचा आणखी एक पर्याय उपलब्ध आहे.
भारतीय संघ
● गोलरक्षक : कृष्ण बहादूर पाठक, पी. आर. श्रीजेश, सूरज करकेरा.
● बचावपटू : हरमनप्रीत सिंग, जर्मनप्रीत सिंग, अमित रोहिदास, जुगराज सिंग, संजय, सुमित, अमीर अली.
● मध्यरक्षक : मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, विवेक सागर प्रसाद, समशेर सिंग, नीलकांत शर्मा, राजकुमार पाल, विष्णूकांत सिंग.
● आक्रमक : आकाशदीप सिंग, मनदीप सिंग, ललित कुमार उपाध्याय, अभिषेक, दिलप्रीत सिंग, सुखजीत सिंग, गुरजंत सिंग, मोहम्मद राहिल मौसीन, बॉबी सिंग धामी, अराइजीत सिंग हुंदल.