मस्कत : भारतीय महिला संघाला ‘हॉकी फाईव्ह विश्वचषक’ स्पर्धेत अखेर उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अंतिम लढतीत भारतीय महिला संघाला नेदरलँड्सकडून २-७ असा पराभव पत्करावा लागला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेदरलँड्सकडून यान्नेरे व्हॅन डी वेन्ने (दुसऱ्या आणि १४व्या मिनिटाला), बेंटे व्हॅन डर वेल्ड (चौथ्या आणि आठव्या मि.), लाना कालसे (११ आणि २७व्या मि.) यांनी प्रत्येकी दोन, तर आणखी एक गोल सोशा बेिनगाने १३व्या मिनिटाला केला. भारताकडून ज्योती छत्री (२०व्या मि.) आणि ऋतुजा पिसाळ (२३व्या मि.) यांनाच गोल करता आला.

हेही वाचा >>>U19 World Cup Cricket: महाराष्ट्राच्या अर्शिन कुलकर्णीचा शतकी नजराणा; अमेरिकेवर २०१ धावांनी खणखणीत विजय

अंतिम लढतीत सुरुवातीपासून दोन्ही संघांच्या खेळाडूंनी गोल करण्याच्या संधी शोधल्या. नेदरलँड्सने दुसऱ्याच मिनिटाला खाते उघडले. त्यानंतर पाच मिनिटांत दोन गोल करून वेल्डने नेदरलँड्सची आघाडी वाढवली. लाना कालसेने ११व्या मिनिटाला ही आघाडी आणखी भक्कम केली. मध्यंतरापर्यंत आणखी दोन गोल करत नेदरलँड्सने ६-० अशा आघाडीसह विजय जवळपास निश्चित केला होता. उत्तरार्धात नेदरलँड्सच्या आक्रमणाला भारतीय संघाने  प्रतिकार केला.

रोख पारितोषिक

भारतीय महिला संघाने हॉकी फाईव्ह विश्वचषकात केलेल्या कामगिरीवर आनंद व्यक्त करताना हॉकी इंडियाने संघातील प्रत्येक खेळाडूस तीन लाख, तर प्रशिक्षक आणि साहाय्यकांना प्रत्येकी १.५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक जाहीर केले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hockey fives world cup tournament indian women team runners up sport news amy