पुढील महिन्यात इपोह (मलेशिया) येथे होणाऱ्या २५व्या सुलतान अझलन शाह चषक हॉकी स्पध्रेसाठी मध्यरक्षक सरदार सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची निवड करताना अनुभवी गोलरक्षक आणि उपकर्णधार पी. आर. श्रीजेशसह सात खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.
रिओला होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पध्रेच्या पाश्र्वभूमीवर अनुभवी खेळाडूंना विश्रांती मिळावी, यासाठी हॉकी वर्ल्ड लीगच्या अंतिम टप्प्यातील सात खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. आक्रमणपटू आकाशदीप सिंग, मध्यरक्षक धरमवीर सिंग, ड्रॅग-फ्लिकर व्ही. आर. रघुनाथ, बचावपटू बिरेंद्र लक्रा, देविंदर वाल्मीकी आणि ललित उपाध्याय या खेळाडूंची निवड करण्यात आलेली नाही. श्रीजेशच्या जागी युवा आकाश अनिल चिकटेचा समावेश करण्यात आला आहे.
संघ
गोलरक्षक : हरजोत सिंग, आकाश अनिल चिकटे.
बचावपटू : रुपिंदर पाल सिंग, जसजित सिंग कुलर, कोठाजित सिंग, सुरेंदर सिंग, हरमनप्रीत सिंग.
मध्यरक्षक : डॅनिश मुज्तबा, चिंगलेनसाना सिंग, मनप्रीत सिंग, सरदार सिंग, एस. के. उथप्पा, हरजीत सिंग.
आघाडीपटू : तलविंदर सिंग, मनदीप सिंग, एस. व्ही. सुनील, रमणदीप सिंग, निक्कीन थिमय्या.

Story img Loader