२१ जुलैपासून लंडनमध्ये होणाऱ्या महिला हॉकी विश्वचषकासाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आलेली आहे. हॉकी इंडियाने या महत्वाच्या स्पर्धेसाठी पुन्हा एकदा अनुभवी खेळाडू राणी रामपालकडे भारतीय संघाचं नेतृत्व सोपवलं आहे. २१ जुलै ते ५ ऑगस्टदरम्यान हा विश्वचषक रंगणार आहे. या स्पर्धेत भारताचा समावेश ब गटात करण्यात आलेला असून, भारतासोबत इंग्लंड, अमेरिका, आयर्लंड हे संघही सहभागी आहेत.

महिला विश्वचषकासाठी असा असेल भारताचा संघ –

गोलकिपर – सविता (उप-कर्णधार), रजनी एटीमाप्रु

बचाव फळी – सुनिता लाक्रा, दिप ग्रेस एक्का, दिपीका, गुरजीत कौर, रीना खोकर

मधळी फळी – नमिता टोपो, लिलीमा मिन्झ, मोनिका, नेहा गोयल, नवजोत कौर, निक्की प्रधान

आघाडीची फळी – राणी रामपाल (कर्णधार), वंदना कटारिया, नवनीत कौर, लारेमिसामी, उदीता

Story img Loader