भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि अनुभवी खेळाडू सरदार सिंहला आगामी वर्ल्ड हॉकीलीग फायनल स्पर्धेसाठीच्या संघातून वगळण्यात आलंय. १ ते १० डिसेंबरदरम्यान ओडीशातील भुवनेश्वर शहरात ही स्पर्धा रंगणार आहे. या महत्वाच्या स्पर्धेसाठी हॉ़की इंडियाने १८ जणांच्या भारतीय संघाची घोषणा केली. गेले काही महिने दुखापतीमुळे बाहेर असलेला भारताचा ड्रॅगफ्लिकर रुपिंदरपाल सिंह आणि बिरेंद्र लाक्रा यांनी भारतीय संघात पुनरागमन केलं आहे. आशिया चषक स्पर्धेत सरदार सिंह भारतीय संघाकडून खेळला होता. त्यामुळे घरच्या मैदानावर खेळवल्या जाणाऱ्या महत्वाच्या स्पर्धेत सरदार सिंहला वगळण्याच्या निर्णयावर सर्व स्तरातून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
वर्ल्ड हॉकीलीग फायनल स्पर्धेसाठी असा असेल भारतीय संघ –
गोलकिपर – आकाश चिकटे, सुरज करकेरा
बचाव फळी – हरमनप्रीत सिंह, अमित रोहीदास, दिप्सन तिर्की, वरुण कुमार, रुपिंदरपाल सिंह, बिरेंद्र लाक्रा
मधली फळी – मनप्रीत सिंह (कर्णधार), चिंगलेनसाना (उप-कर्णधार), एस.के. उथप्पा, सुमीत, कोठाजीत सिंह
आघाडीची फळी – एस. व्ही. सुनील, आकाशदीप सिंह, मनदीप सिंह, ललित कुपार उपाध्याय, गुरजंत सिंह