आंतरराष्ट्रीय हॉकी परिषदेने आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. २३ जून ते १ जुलै दरम्यान नेदरलँडच्या ब्रेडा शहरात ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. यजमान नेदरलँडसह अर्जेंटीना, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, भारत आणि पाकिस्तान हे संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेची सुरुवात भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याने होणार असून, यजमान नेदरलँडचा पहिला सामना अर्जेंटीनाविरुद्ध होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं वेळापत्रक पुढीलप्रमाणे –
२३ जून २०१८ – भारत विरुद्ध पाकिस्तान
नेदरलँड विरुद्ध अर्जेंटीना
ऑस्ट्रेलिया विरुद्ध बेल्जियम
२४ जून २०१८ – भारत विरुद्ध अर्जेंटीना
नेदरलँड विरुद्ध बेल्जियम
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान
२६ जून २०१८ – अर्जेंटीना विरुद्ध बेल्जियम
नेदरलँड विरुद्ध पाकिस्तान
२७ जून २०१८ – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
२८ जून २०१८ – अर्जेंटीना विरुद्ध पाकिस्तान
भारत विरुद्ध बेल्जियम
नेदरलँड विरुद्ध ऑस्ट्रेलिया