भारतात २०१६ मध्ये होणाऱ्या ज्युनिअर विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी संघाची बांधणी करण्याच्या हेतूने माजी प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांची ज्युनियर संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. हरेंद्र सिंग हे २५ एप्रिल रोजी भारतीय संघाच्या सराव शिबिरात प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतील. ‘‘२०१६च्या ज्युनियर हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ तयार करण्यासाठी हरेंद्र सिंग यांच्यासारख्या अनुभवी व्यक्तीकडे आम्ही प्रशिक्षकपद सोपवत आहोत. प्रशिक्षकपदाचा आणि खेळाडू म्हणून त्यांच्या गाठीशी असलेला अनुभव खेळाडूंना परिपक्व होण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. ज्युनियर विश्वचषकासाठी भारताचा सक्षम आणि बलाढय़ संघ तयार होईल, अशी आशा आहे. हरेंद्र यांनी याआधी भारतीय वरिष्ठ संघाचे प्रशिक्षकपद भूषवले आहे. आता ज्युनियर संघाच्या प्रशिक्षकपदाच्या भूमिकेसाठी त्यांचे स्वागत आहे,’’ असे हॉकी इंडियाचे सचिव नरिंदर बात्रा यांनी सांगितले.

Story img Loader