नवी दिल्ली : पुढील महिन्यात टोक्यो येथे होणाऱ्या ऑलिम्पिकसाठीच्या सराव हॉकी स्पर्धेकरिता भारताचा कर्णधार मनप्रीत सिंग आणि अनुभवी गोलरक्षक पी. आर. श्रीजेश यांना भारतीय हॉकी संघातून विश्रांती देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

१७ ते २१ ऑगस्टदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेसाठी सुरेंद्र कुमार, रुपिंदरपाल सिंग, बिरेंद्र लाकरा आणि आकाशदीप सिंग या अनुभवी खेळाडूंनाही विश्रांती देण्यात आली आहे. ड्रॅग-फ्लिकर हरमनप्रीत सिंग या मनप्रीतच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्व सांभाळेल तर आघाडीवीर मनदीप सिंग हा उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळेल. आशीष टोपनो आणि शमशेर सिंग या नव्या चेहऱ्यांना भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर अनुभवी आघाडीवीर एस. व्ही. सुनीलने गुडघ्याच्या दुखापतीतून सावरत भारतीय संघात पुनरागमन केले आहे. जवळपास नऊ महिने तो दुखापतीमुळे संघाबाहेर होता. श्रीजेशच्या गैरहजेरीत कृष्णन पाठक आणि युवा सूरज करकेरा हे गोलरक्षकाच्या भूमिकेत असतील.

भारतीय हॉकी संघ

कृष्णन पाठक, सूरज करकेरा, गुरिंदर सिंग, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), कोठाजित सिंग खांडोंगबाम, हार्दिक सिंग, निळकंठ शर्मा, विवेक सागर प्रसादर, जसकरण सिंग, मनदीप सिंग (उपकर्णधार), गुरसाहिबजित सिंग, निलम संदीप झेस, जरमनप्रीत सिंग, वरुण कुमार, आशिष टोपनो, एस. व्ही. सुनील, गुरजंत सिंग, शमशेर सिंग.

नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा लक्षात ठेवून संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. संघातील अनेक खेळाडू गेली १२ महिने सातत्याने स्पर्धामध्ये खेळत आहेत. या स्पर्धेद्वारे नव्या खेळाडूंना चाचपणी करण्याची संधी मिळेल. पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी टोक्योची तयारी कशी झाली आहे, तसेच तेथील खेळपट्टीवर खेळण्याचा अनुभव मिळावा, यासाठी ही स्पर्धा महत्त्वाची आहे.

– ग्रॅहम रीड, भारताचे मुख्य प्रशिक्षक