आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हॉकी इंडियाने आज ४८ खेळाडूंची घोषणा केली आहे. २८ मे पासून या राष्ट्रीय शिबीराला सुरुवात होणार असून. यानंतर हे सर्व खेळाडू २१ दिवस बंगळुरुतल्या ‘साई’च्या सरावकेंद्रात एकत्र सराव करणार आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेतल्या खराब कामगिरीनंतर हॉकी इंडियाने प्रशिक्षक जोर्द मरीन यांना महिला संघाच्या प्रशिक्षकपदी परत पाठवलं होतं, तर हरेंद्रसिंह यांच्या हाती पुरुष संघाची कमान सोपवली होती. त्यानंतर भारतीय संघासाठी ही पहिली मोठी स्पर्धा असणार आहे. नेदरलँडच्या ब्रेडा शहरात चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलेलं आहे.

राष्ट्रीय शिबीरासाठी निवड करण्यात आलेले भारताचे खेळाडू –

गोलकिपर – पी. आर. श्रीजेश, सुरज करकेरा, क्रिशन बहादुर पाठक, विकास दहिया, जगदीप दयाल, प्रशांत कुमार चौहान

बचावपटू – हरमनप्रीत सिंह, रुपिंदरपाल सिंह, गुरिंदर सिंह, वरुण कुमार, कोठाजीत सिंह, सुरेंद्र कुमार, अमित रोहिदास, बिरेंद्र लाक्रा, निलम सेस, दिप्सन तिर्की, गुरजिंदर सिंह, जरमनप्रीत सिंह, अमित गौडा, आनंद लाक्रा

मधळी फळी – मनप्रीत सिंह, चिंगलीन साना, सुमीत, सिमरनजीत सिंह, निलकांत शर्मा, सरदार सिंह, हार्दिक सिंह, ललित कुमार उपाध्याय, राज कुमार पाल, अमॉन तिर्की, धर्मेंद्र सिंह, मनप्रीत, विवेक सागर प्रसाद

आघाडीची फळी – एस. व्ही. सुनील, आकाशदिप सिंह, गुरजंत सिंह, मनदीप सिंह, रमणदीप सिंह, दिलप्रीत सिंह, सुमित कुमार, मोहम्मद उमर, अबराहन बेलिमग्गा, मोहम्म मौसिन, अरमान कुरेशी, सुखजित सिंह, गगनदीप सिंह (सिनीअर), प्रदिप सिंह, मणिंदरजीत सिंह

Story img Loader