भारतात हॉकी विकासासाठी हॉकी इंडियाने (एचआय) भारतीय क्रीडा प्राधिकरण (साइ) यांच्याशी तीन वर्षांचा ऐतिहासिक करार केला आहे. या करारामुळे भारतीय हॉकीच्या नव्या युगाला प्रारंभ होणार आहे.
बुधवारी एचआय आणि साइ यांच्यात तीन वर्षांचा सामंजस्य करार झाला. या कराराच्या माध्यमातून देशात या खेळाच्या विकास आणि प्रचार करण्याकरिता योग्य उपाययोजना करण्यात येणार आहे. तसेच युवकांमध्ये या खेळाची ओढी निर्माण करण्याचाही प्रयत्न होणार आहे.