भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदावरून मायकेल नॉब्ज यांची अखेर हकालपट्टी करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात भारतीय हॉकी संघाच्या निराशाजनक कामगिरीमुळे नॉब्ज यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. हॉकी इंडियाचे सरचिटणीस नरिंदर बात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, नॉब्ज हे प्रशिक्षक असताना संघाची कोणतीही प्रगती होत नसल्याने त्यांना काढून टाकण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. त्यानुसार त्यांना नियमाप्रमाणे महिनाभराआधी प्रशिक्षकपदावरून पायउतार होण्यासाठीची नोटीसही पाठविण्यात आली आहे. मागील महिन्यात झालेल्या हॉकी विश्वलीग स्पर्धेमध्येही भारताला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. आता रोलंट ओल्टमन्स यांची भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदावर नियुक्ती करण्यात आली असल्याचेही बात्रा यांनी सांगितले आहे.

Story img Loader