पीटीआय, नवी दिल्ली

सहा वर्षांपूर्वी पाठीच्या दुखापतीमुळे उजव्या पायाला पक्षाघात झाल्याने हॉकीपटू सुखजित सिंगला बऱ्याच आव्हानांना सामोरे जावे लागले. मात्र, आयुष्यातील हा सर्वांत कठीण काळ मागे सारून सुखजित ठामपणे उभा राहिला आणि यंदा पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत तो भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. यात दमदार कामगिरी करून भारताला यश मिळवून देत पदार्पणाची ऑलिम्पिक स्पर्धा स्वप्नवत करण्याचा सुखजितचा मानस आहे.

The migration in 2022, supported by airborne foster parents.
नामशेष होत चाललेले पक्षी, हरवलेले स्थलांतराचे मार्ग आणि विमानातून मार्गदर्शन; संवर्धनतज्ज्ञ नेमके काय करत आहेत?
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Vasai, BJP leader, vadhavan port, fishermen,
वसई : वाढवण बंदराच्या विरोधात भाजप नेत्याच्या दुटप्पी भूमिकेमुळे मच्छीमारांमध्ये संभ्रम
Pimpri, pimpri chinchwad, rickshaw accident, potholes, road disrepair, municipal corporation, Nigdi police
पिंपरी : खड्ड्याने घेतला महिलेचा जीव
Leopard and dog Fight Dogs Fight With Leopard See Who Will Win In The War Animal shocking Video
“जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं” कुत्र्यांनी अवघ्या १० सेकंदात बिबट्याला फाडून टाकलं; VIDEO पाहून झोप उडेल
man suicide due to father-in-laws troubles Crime against six people
सासरच्या त्रासामुळे तरुणाची आत्महत्या; सासू, सासऱ्यांसह सहाजणांविरुद्ध गुन्हा
Vinesh Phogat opinion about the development of wrestling sport news
महिला कुस्तीपटू घडविल्यास अधिक आनंद; कुस्तीच्या विकासासाठी प्रयत्नशील राहण्याचा विनेशचा मनोदय
chhattisgarh woman murdered
Chhattisgarh : महिलेच्या ‘या’ तगाद्यानं घटस्फोटित पती अन् प्रियकर वैतागला, दोघांनी ‘दृष्यम’ चित्रपट पाहिला अन्…; खळबळजनक घटना समोर

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेला २६ जुलैपासून सुरुवात होणार असून यात भारतीय पुरुष हॉकी संघाला पदकासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. ‘‘ऑलिम्पिकमध्ये खेळणे हे माझे आणि माझ्या कुटुंबीयांचे स्वप्न होते. कोणत्याही खेळाडूच्या कारकीर्दीतील ही सर्वांत मोठी स्पर्धा असते. ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे,’’ असे २८ वर्षीय सुखजित ‘हॉकी इंडिया’च्या निवेदनात म्हणाला. सुखजितने २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. आता ऑलिम्पिकमध्ये तो भारतासाठी महत्त्वाची भूमिका बजावणे अपेक्षित आहे.

हेही वाचा >>>Paris Olympics 2024 : सिगारेट ओढणे ‘या’ स्टार खेळाडूला पडले चांगलेच महागात, ऑलिम्पिकमधून पाठवण्यात आले मायदेशी

जलंधर येथे जन्मलेल्या सुखजितने वयाच्या सहाव्या वर्षापासून हॉकी खेळण्यास सुरुवात केली. त्याला वडिलांकडूनच ही प्रेरणा मिळाली. त्याचे वडील अजित सिंग पंजाब पोलिसांकडून हॉकी खेळायचे. कमी वयातच हॉकी खेळण्यास सुरुवात करूनही भारतीय संघापर्यंत पोहोचण्यासाठी सुखजितला बराच काळ वाट पाहावी लागली.

२०१८ मध्ये त्याची भारताच्या सीनियर संघाच्या संभाव्य खेळाडूंच्या शिबिरासाठी निवड झाली होती. मात्र, पाठीच्या दुखापतीमुळे काही काळासाठी त्याच्या पायाला पक्षाघात झाला. त्यामुळे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला आणखी काही वर्षे वाट पाहावी लागली. हा आपल्या आयुष्यातील सर्वांत अवघड काळ होता असे सुखजित सांगतो.

हेही वाचा >>>Deepak Hooda : भारतीय क्रिकेटपटूने गर्लफ्रेंडशी बांधली लग्नगाठ, नऊ वर्षांपासून एकमेकांना करत होते डेट

‘‘जवळपास पाच महिने मी अंथरुणाला खिळून होतो. या परिस्थितीशी जुळवून घेणे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप अवघड गेले. हॉकी खेळणे दूरच, मला चालताही येत नव्हते. त्यामुळे देशासाठी हॉकी खेळण्याचे स्वप्न दिवसागणिक दूर जात असल्याची भावना होती. मात्र, कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे आणि प्रोत्साहनामुळे मी पुन्हा उभा राहू शकलो. विशेषत: माझ्या वडिलांनी कधीही आशा सोडली नाही. त्यांच्यामुळेच मी भारतासाठी हॉकी खेळण्याचे स्वप्न पूर्ण करू शकलो,’’ असे सुखजितने नमूद केले.

माझी मेहनत आणि समर्पण याचे फळ मला मिळाले आहे. भारतीय संघाला माझ्याकडून काही अपेक्षा आहेत. त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आणि संघातील माझी भूमिका चोख पार पाडण्याचा माझा प्रयत्न असेल. पॅरिसमध्ये माझे सर्वस्व देऊन माझ्या प्रशिक्षक आणि सहकाऱ्यांच्या विश्वासाची परतफेड करण्याचा माझा निर्धार आहे. – सुखजित सिंग