पीटीआय, नवी दिल्ली
सहा वर्षांपूर्वी पाठीच्या दुखापतीमुळे उजव्या पायाला पक्षाघात झाल्याने हॉकीपटू सुखजित सिंगला बऱ्याच आव्हानांना सामोरे जावे लागले. मात्र, आयुष्यातील हा सर्वांत कठीण काळ मागे सारून सुखजित ठामपणे उभा राहिला आणि यंदा पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत तो भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. यात दमदार कामगिरी करून भारताला यश मिळवून देत पदार्पणाची ऑलिम्पिक स्पर्धा स्वप्नवत करण्याचा सुखजितचा मानस आहे.
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेला २६ जुलैपासून सुरुवात होणार असून यात भारतीय पुरुष हॉकी संघाला पदकासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. ‘‘ऑलिम्पिकमध्ये खेळणे हे माझे आणि माझ्या कुटुंबीयांचे स्वप्न होते. कोणत्याही खेळाडूच्या कारकीर्दीतील ही सर्वांत मोठी स्पर्धा असते. ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे,’’ असे २८ वर्षीय सुखजित ‘हॉकी इंडिया’च्या निवेदनात म्हणाला. सुखजितने २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. आता ऑलिम्पिकमध्ये तो भारतासाठी महत्त्वाची भूमिका बजावणे अपेक्षित आहे.
हेही वाचा >>>Paris Olympics 2024 : सिगारेट ओढणे ‘या’ स्टार खेळाडूला पडले चांगलेच महागात, ऑलिम्पिकमधून पाठवण्यात आले मायदेशी
जलंधर येथे जन्मलेल्या सुखजितने वयाच्या सहाव्या वर्षापासून हॉकी खेळण्यास सुरुवात केली. त्याला वडिलांकडूनच ही प्रेरणा मिळाली. त्याचे वडील अजित सिंग पंजाब पोलिसांकडून हॉकी खेळायचे. कमी वयातच हॉकी खेळण्यास सुरुवात करूनही भारतीय संघापर्यंत पोहोचण्यासाठी सुखजितला बराच काळ वाट पाहावी लागली.
२०१८ मध्ये त्याची भारताच्या सीनियर संघाच्या संभाव्य खेळाडूंच्या शिबिरासाठी निवड झाली होती. मात्र, पाठीच्या दुखापतीमुळे काही काळासाठी त्याच्या पायाला पक्षाघात झाला. त्यामुळे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला आणखी काही वर्षे वाट पाहावी लागली. हा आपल्या आयुष्यातील सर्वांत अवघड काळ होता असे सुखजित सांगतो.
हेही वाचा >>>Deepak Hooda : भारतीय क्रिकेटपटूने गर्लफ्रेंडशी बांधली लग्नगाठ, नऊ वर्षांपासून एकमेकांना करत होते डेट
‘‘जवळपास पाच महिने मी अंथरुणाला खिळून होतो. या परिस्थितीशी जुळवून घेणे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप अवघड गेले. हॉकी खेळणे दूरच, मला चालताही येत नव्हते. त्यामुळे देशासाठी हॉकी खेळण्याचे स्वप्न दिवसागणिक दूर जात असल्याची भावना होती. मात्र, कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे आणि प्रोत्साहनामुळे मी पुन्हा उभा राहू शकलो. विशेषत: माझ्या वडिलांनी कधीही आशा सोडली नाही. त्यांच्यामुळेच मी भारतासाठी हॉकी खेळण्याचे स्वप्न पूर्ण करू शकलो,’’ असे सुखजितने नमूद केले.
माझी मेहनत आणि समर्पण याचे फळ मला मिळाले आहे. भारतीय संघाला माझ्याकडून काही अपेक्षा आहेत. त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आणि संघातील माझी भूमिका चोख पार पाडण्याचा माझा प्रयत्न असेल. पॅरिसमध्ये माझे सर्वस्व देऊन माझ्या प्रशिक्षक आणि सहकाऱ्यांच्या विश्वासाची परतफेड करण्याचा माझा निर्धार आहे. – सुखजित सिंग